नगर – सारथी’च्या पुढाकाराने गावागावांत विविध योजनांचा प्रसार

नगर – ‘सारथी’ संस्थेच्या पुढाकाराने संशोधक प्रा. रामेश्वर तांबे पाटील यांनी सारथीसह महाज्योती, बार्टी,अमृत,आदिवासीसह विविध शासकीय योजनेचा गेल्या तीन महिन्यांपासुन शेवगाव तालुक्यातील सर्व विद्यालयातुन स्व-खर्चाने प्रचार व प्रसार करत असुन या उपक्रमातुन माहिती मिळाल्याने तालुक्यातील २० विद्यार्थ्यांना ‘महाज्योती’मार्फत मोफत टॅब मिळाल्याची माहिती शेवगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृत्पी कोलते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
‘सारथी’चे संशोधक प्रा. रामेश्वर लक्ष्मण तांबे पाटील यांनी स्व- खर्चाने संबंध तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये तसेच ग्रामसभा, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या प्रशासकीय बैठकीप्रसंगी गेल्या तीन महिन्यांपासुन ‘सारथी’च्या योजनांच्या माहितीपर कार्यशाळा यशस्वीपणे घेतल्या. शासन संस्थेच्या विविध लोककल्याणकारी योजनांबरोबरच ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष’, ‘राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना’, ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजना’ ‘आयुष्यमान भारत कार्ड’, ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबई’ आणि विविध शालेय,
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच्या विविध शिष्यवृत्ती तसेच स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, विविध फेलोशिप तसेच कृषी, कृषी पुरक व किमान कौशल्य रोजगारक्षम व व्यक्तिमत्त्व विकासासाठीचे विविध प्रशिक्षणे यांसह विविध लोक कल्याणकारी शासकीय योजनांची सविस्तर माहिती देत योजनांच्या अटी-शर्तीसह अर्ज करण्याची पध्दत,आवश्यक कागदपत्रे,लाभाचे स्वरुप वैगेरे बाबीचा सविस्तर आढावा घेतला.





