11 डिसेंबरला दवाखणे बंद
Updated On:

पुणे – आयुर्वेदिक डॉक्टरांना शल्यकर्म करण्याच्या केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने 11 डिसेंबर रोजी राष्ट्रीय पातळीवर बंद पुकारला आहे.
सर्व प्रॅक्टिशनर्सना दवाखाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक आणि कोविड संदर्भातील सेवा वगळता अन्य सेवा बंद असणार आहेत.
सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत बंद असणार आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून, त्यामध्ये आय.सी.यु., अपघातात सापडलेल्या रुग्णासाठी असलेली अत्यावश्यक सेवा, प्रसूतीसेवा यांचा समावेश आहे.





