Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण; न्यायालयाने निकाल ठेवला राखून
Disha Salian Case : दिवंगत दिशा सालियन मृत्यूप्रकरणी विशेष चौकशी आणि एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील अंतिम सुनावणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे.

Disha Salian Case : मुंबई उच्च न्यायालयात दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी संबंधित याचिकेवरील अंतिम सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. सुनावणीदरम्यान, आदित्य ठाकरेंच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता सुदीप पासबोला यांनी याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला. (Disha Salian Case)
या युक्तिवादात केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांची मुले निलेश आणि नितेश राणे यांचा उल्लेख झाला असल्याचे समोर आले आहे. (Disha Salian Case)
दिशा सालियन मृत्यूप्रकरणात दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. सुनावणी सुरु असताना न्या. सारंग कोतवाल आणि न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने तपासातील अनेक बाबींवर प्रश्न उपस्थित केले. (Disha Salian Case)
पण, या टप्प्यावर न्यायालय कोणताही अंतिम निष्कर्ष काढत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. उपलब्ध कागदपत्रांमधील काही बाबींची सखोल छाननी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. गुरुवारी सुनावणी झाल्यानंतर शुक्रवारीही सरकारी वकील शिशिर हिरे यांचा युक्तिवाद पाहायला मिळाला. (Disha Salian Case)
दरम्यान, राजकारण्यांविरुद्ध केलेल्या तक्रारीत आम्हाला काही रस नसून एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे, याच दृष्टीने आम्ही या प्रकरणाकडे बघतो असे न्यायालयाने म्हटल्यामुळे शुक्रवारी राजकारण्यांविरुद्ध केलेल्या तक्रारीत आम्हाला काही रस नसून एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे, याच दृष्टीने आम्ही या प्रकरणाकडे बघतो असे न्यायालयाने म्हटले होते. (Disha Salian Case)
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट





