मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी ही अशीच एक अभिनेत्री आहे जिची फॅन फॉलोईंग कालांतराने खूप वाढली आहे. जेव्हापासून या अभिनेत्रीने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले आहे, तेव्हापासून तिचे नाव अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडले जात आहे. दोघांनाही त्यांचे नाते मान्य नाही, असे जरी असले तरी ते अनेकवेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. मात्र यावेळी दिशा एका दुसऱ्याच व्यक्तीबरोबर दिसली आणि कॅमेरा पाहताच तिने चेहरा लपवायला सुरुवात केली.
View this post on Instagram
अभिनेत्री दिशा आणि अभिनेता टायगरमध्ये नक्कीच काहीतरी आहे, असा अंदाज रसिकांना आहे. पण नुकतीच ती एका अनोळखी व्यक्तीसोबत स्पॉट झाली. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री एका मित्रासोबत इव्हिनिंग वॉकला निघालेली दिसून येत आहे. यावेळी कॅमेरा तिच्यावर फोकस करताच तिने टोपीने चेहरा लपवायला सुरुवात केल्याचे दिसून आले. दरम्यान दिशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दिशाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातली होती आणि तोंडावर मास्क घातलेला दिसत आहे. यादरम्यान दिशाने पांढऱ्या टँक टॉपसह लाल शॉर्ट्स परिधान केले होते. या व्हिडिओमध्ये ती तिच्या मैत्रासोबत दिसत आहे. अभिनेत्रीला कॅमेऱ्यासमोर यायचे नसल्यामुळे ती वारंवार आपला चेहरा झाकत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. आता अनेक युजर्सनी तिला यावरून ट्रोल करायला सुरुवात केली. दिशा तिचा चेहरा का लपवत आहे हे जाणून घेण्याचा अनेक लोक प्रयत्न करत आहेत.