Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून २७२०३ क्युसेकने विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना अलर्ट
Khadakwasla Dam : पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्गात पुन्हा वाढ किंवा घट होऊ शकते. त्यामुळे मुठा नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.

Khadakwasla Dam : खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ करण्यात आली आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (३१ जुलै २०२६) दुपारी १२ वाजता धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात सोडला जाणारा विसर्ग १६,२४७ क्युसेकने वाढवून एकूण २२,८८० क्युसेक करण्यात येणार आहे. (Khadakwasla Dam)
आता समोर आलेल्या माहितीनुसार यात पुन्हा वाढ करण्यात आली असून २७२०३ क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात येणार आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सांगितले आहे की, पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्गात पुन्हा वाढ किंवा घट होऊ शकते. त्यामुळे मुठा नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. (Khadakwasla Dam)

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून २२,८८० क्युसेकने विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना अलर्ट
प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन केले असून नदीपात्रातील साहित्य, वाहने किंवा जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित यंत्रणांनी सखल भागातील नागरिकांना सतर्क करून आवश्यक ती उपाययोजना करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.





