दिग्दर्शक राजामौलींचे भगवान हनुमानाबाबत विधान; नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल

SS Rajamouli Trolling | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे देवावर विश्वास ठेवत नाही. ह्याबाबत त्यांनी आधीही मुलाखतींमध्ये सांगितले आहे. अलीकडेच त्यांनी ‘वाराणसी’ या चित्रपटाच्या भव्यदिव्य कार्यक्रमादरम्यान पुन्हा एकदा याबाबत विधान केले आहे. ज्यावरून त्यांना सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
शनिवार ‘वाराणसी’ चित्रपटाचा भव्य कार्यक्रम वाराणसीमध्ये आयोजित करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी केले असून, यावेळी त्यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट वाराणसीमध्ये उपस्थित होती. प्रियांका चोप्रा, महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन हेही पाहायला मिळाले.
‘वाराणसी’च्या कार्यक्रमादरम्यान राजामौली भावूक होत म्हणाले, “मी देवावर विश्वास ठेवत नाही. माझ्या वडिलांनी सांगितलं की देव हनुमान सर्व गोष्टी सांभाळून घेतील. मला विचार करून खूप राग आला की अशा पद्धतीने गोष्टी सांभाळत आहेत का? माझी पत्नी हनुमानाची खूप मोठी भक्त आहे. ती अशा प्रकारे वागते, जणू ते तिचे मित्रच आहेत आणि ती त्यांच्याशी संवाद साधते. मला तिच्यावरही राग आला. जेव्हा माझ्या वडिलांनी हनुमानाविषयी सांगितलं आणि यशासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्याचा सल्ला दिला, तेव्हाही मला खूप राग आला.” SS Rajamouli Trolling |
Blaming Hanuman for some technical glitch for whom humans aren’t equal to a partical of sand😂
Never expected this cheap behaviour from him for such a tinpot thing man🤡🤦#SSRajamouli pic.twitter.com/21nJmh6uAk
— ನಿ-KILL (@___ZENITSUU___) November 16, 2025
राजामौलींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याच्यावर संताप व्यक्त केला आहे. SS Rajamouli Trolling |
‘आम्हा सर्वांना माहीत आहे की तुम्ही नास्तिक आहात राजामौली. पण यात भगवान हनुमान यांना ओढण्याची हिंमत करू नका’, ‘तुम्ही चित्रपटाचं नाव वाराणसी का ठेवलंन? त्यात पौराणिक पात्रांवर आधारित भूमिका का दाखवल्या? तुमच्याकडून अशा गोष्टीची अपेक्षा नाही’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांना सुनावले आहे. दरम्यान, एस. एस. राजामौली हे पौराणिक विषयांना अधोरेखित चित्रपट बनवत असले, तरी त्यांचा ईश्वरावर विश्वास नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा म्हंटल्याने ते सोशल मिडियावर ट्रोल होत आहेत. SS Rajamouli Trolling |
हेही वाचा:
समुद्राखालील ज्वालामुखीचा उद्रेक लांबला; कधी होणार सक्रिय? शास्त्रज्ञांनी वर्तवला नवा अंदाज





