Swara Bhaskar : मद्यधुंद अवस्थेत दिग्दर्शकाने दार ठोठावलं; मध्यरात्री केली विचित्र मागणी, स्वरा भास्करने सांगितला धक्कादायक प्रसंग
Swara Bhaskar : एका रोमँटिक सीनच्या सरावासाठी दिग्दर्शकाने स्वराला एकांतात भेटण्यास बोलावले. या भेटीदरम्यान केवळ आपण दोघेच असणार असल्याचे समजल्यानंतर स्वराने त्याला स्पष्टपणे नकार दिला.

Swara Bhaskar : अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या ‘राईज अँड फॉल सीझन २’ या रिॲलिटी शोमुळे चर्चेत आहे. शोदरम्यान स्वराने एका मद्यधुंद दिग्दर्शकाने तिच्यासोबत गैरवर्तन करत अजब मागणी केली होती. तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील घडलेली धक्कादायक घटना तिने सांगितली.
शोमधील सह-स्पर्धक प्रियांका चहर चौधरी आणि तेज प्रताप यादव यांच्यासोबत संवाद साधताना स्वराने हा अनुभव सांगितला. ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाच्या यशानंतर तिला मुख्य अभिनेत्री म्हणून एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.
एका रोमँटिक सीनच्या सरावासाठी दिग्दर्शकाने स्वराला एकांतात भेटण्यास बोलावले. या भेटीदरम्यान केवळ आपण दोघेच असणार असल्याचे समजल्यानंतर स्वराने त्याला स्पष्टपणे नकार दिला. कॅमेरामन आणि इतर कलाकारांच्या उपस्थितीतच सीनचा सराव केला जाईल, असे तिने ठामपणे सांगितले.
यानंतर स्वराने गेस्ट हाऊसमधील आपल्या खोलीत परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर तिला आणखी एक धक्का बसला. संबंधित दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर दारूच्या नशेत तिथे बसलेले होते. या परिस्थितीने घाबरलेल्या स्वराने तिथून आपल्या खोलीत जाणे पसंत केले.
मी तुला एक मिठी मारू शकतो का?
काही तासांनंतर मध्यरात्रीच्या सुमारास तो दिग्दर्शक मद्यधुंद अवस्थेत स्वराच्या खोलीबाहेर आला आणि जोरजोरात दरवाजा ठोठावू लागला. या प्रकारामुळे स्वरा प्रचंड घाबरली होती. अशा अवस्थेत असताना तिने दरवाजा उघडल्यानंतर दिग्दर्शकाने तिला, “मी तुला एक मिठी मारू शकतो का?” असा प्रश्न विचारला. त्यावर स्वराने त्याला स्पष्टपणे नकार दिला. “सर, तुम्ही इथून निघून जा. मला तुमची खूप भीती वाटत आहे.” असे तिने त्याला ठणकावून सांगितले.
Gandhi Jayanti: स्वातंत्र्यलढ्यापासून सामाजिक समतेपर्यंत; आजही गांधींच्या विचारांची का होते चर्चा?






