Dipti Gaur Mukherjee: NEET पेपरफुटीनंतर शिक्षण मंत्रालयात मोठा बदल ; कोण आहेत नव्या उच्च शिक्षण सचिव दीप्ती गौर मुखर्जी?
Dipti Gaur Mukherjee : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मधील व्यापक असंतोष, नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने प्रशासकीय यंत्रणेत एक मोठे आणि ठोस पाऊल उचलले आहे.

Dipti Gaur Mukherjee: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मधील व्यापक असंतोष, नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने प्रशासकीय यंत्रणेत एक मोठे आणि ठोस पाऊल उचलले आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी दीप्ती गौड मुखर्जी यांची देशाच्या नव्या उच्च शिक्षण सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Dipti Gaur Mukherjee)
शिक्षण मंत्रालयातील या अत्यंत संवेदनशील पदावरील हा बदल केवळ एक साधी बदली म्हणून नव्हे, तर पेपरफुटी प्रकरणानंतर डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि परीक्षा पद्धतीत पारदर्शकता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी उचललेले एक मोठे ‘सर्जिकल स्ट्राइक’ म्हणून पाहिले जात आहे. (Dipti Gaur Mukherjee)
२० दिवसांत दोन बदल: अधिकाऱ्यांना का हटवण्यात आले? Dipti Gaur Mukherjee:
कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (ACC) जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, सरकारने आपल्याच २३ जुलैच्या पूर्वीच्या आदेशात अंशतः सुधारणा करून हा निर्णय घेतला आहे.
विनीत जोशी यांची बदली: नीट प्रकरण चिघळल्यानंतर, उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांना पदावरून हटवून पंचायत राज मंत्रालयात बदली करण्यात आली होती. (Dipti Gaur Mukherjee)
दीप्ती यांनी नरेश पाल गंगवार यांची जागा घेतली: १९९४-बॅचचे आयएएस अधिकारी नरेश पाल गंगवार यांच्या जागी सुरुवातीला विनीत जोशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, काही दिवसांतच या निर्णयात बदल करण्यात आला आणि आता दीप्ती गौर मुखर्जी यांची नव्या उच्च शिक्षण सचिवपदी कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. (Dipti Gaur Mukherjee)
दीप्ती गौर मुखर्जी कोण आहेत?
१९९३-बॅचच्या मध्य प्रदेश केडरच्या आयएएस अधिकारी: दीप्ती गौर मुखर्जी या मध्य प्रदेश केडरच्या १९९३ बॅचच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत.
कॉर्पोरेट व्यवहार सचिव ते शिक्षण मंत्रालय: या नवीन नियुक्तीपूर्वी, त्यांनी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयात सचिव म्हणून पदभार सांभाळला होता.
एका कडक प्रशासक म्हणून प्रतिमा: त्यांनी मध्य प्रदेश सरकारमधील आरोग्य, उच्च शिक्षण आणि महसूल यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये प्रधान सचिव म्हणून काम केले आहे. प्रशासकीय बाबी आणि गुंतागुंतीच्या प्रणाली मार्गी लावणाऱ्या, अत्यंत कडक आणि नियमांचे पालन करणाऱ्या अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात. (Dipti Gaur Mukherjee)
दीप्ती यांच्यासमोरील तीन सर्वात मोठी आव्हाने कोणती आहेत? Dipti Gaur Mukherjee:
नीट (NEET) आणि यूजीसी-नेट (UGC-NET) सारख्या प्रमुख राष्ट्रीय परीक्षांच्या घोटाळ्यानंतर, हे पद दीप्ती गौड मुखर्जी यांच्यासाठी काट्यांचा मुकुट ठरणार आहे.
एनटीएच्या (NTA) रचनेत मोठे बदल: इस्रोचे (ISRO) माजी प्रमुख डॉ. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे आणि एनटीएची विश्वासार्हता पुनर्संचयित करणे. (Dipti Gaur Mukherjee)
आगामी प्रवेश परीक्षांचे पारदर्शक आयोजन: देशभरातील लाखो उमेदवारांचा विश्वास डगमगला आहे. अशा परिस्थितीत, आगामी सत्राच्या परीक्षा पूर्णपणे पेपरफुटी-मुक्त करणे हे एक मोठे आव्हान असेल. (Dipti Gaur Mukherjee)
संसद आणि विरोधी पक्षांकडून तीव्र प्रश्नांना सामोरे जाणे: पेपरफुटीचा मुद्दा संसदेपासून ते रस्त्यांपर्यंत तापला आहे, धोरणात्मक निर्णयांमध्ये पारदर्शकता राखणे हे त्यांचे प्राधान्य असेल. (Dipti Gaur Mukherjee)
प्रशासकीय फेरबदलात या अधिकाऱ्यांनाही नवीन जबाबदाऱ्या मिळाल्या
केंद्र सरकारने केलेल्या या मोठ्या प्रशासकीय फेरबदलात, इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्याही बदलण्यात आल्या आहेत. पल्लवी जैन गोविल यांची युवक व्यवहार आणि कॉर्पोरेट व्यवहार विभागाच्या नवीन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Dipti Gaur Mukherjee)
कॅबिनेट सचिवालयातील माजी ओएसडी सुशील कुमार लोहानी यांची भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या (IWAI) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी अर्चना वर्मा यांची व्ही. एल. कांता राव यांच्या जागी जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. (Dipti Gaur Mukherjee)






