दीपिका कक्कर गंभीर आजाराचा करतेय सामना; पती शोएबने दिली हेल्थ अपडेट

Dipika Kakar Liver Tumor | अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या कोणत्याही मालिकेत काम करताना दिसत नाही. मात्र ती आणि तिचा पती शोएब व्लॉग्सद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अलीकडेच शोएब इब्राहिमने यूट्यूब व्लॉग्सद्वारे दीपिकाला एक गंभीर आजार झाला असल्याचा खुलासा केला आहे. दीपिकाच्या यकृतात (लिव्हर) टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर आढळला आहे. ज्यानंतर दीपिकाच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
शोएबने सांगितले की, काही दिवसांपूर्वी दीपिकाला पोटदुखीची समस्या जाणवू लागली होती. सुरुवातीला त्यांनी अॅसिडिटी समजून घरीच उपचार केले. मात्र जेव्हा वेदना कमी झाल्या नाहीत तेव्हा त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, दीपिकाच्या यकृताच्या डाव्या भागात टेनिस बॉलसारखा ट्यूमर आहे. हे ऐकल्यावर दीपिका आणि शोएब दोघांचीही चिंता वाढली. ट्यूमर कर्करोगाचा असण्याची शक्यता वाटत होती. मात्र CT स्कॅन रिपोर्टमध्ये कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. तरीही खात्री करण्यासाठी काही अतिरिक्त चाचण्या करण्यात येणार आहेत.
View this post on Instagram
दीपिका गेल्या 3 दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होती. तिला गुरूवारी 15 मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे. दीपिकाच्या यकृतातील ट्यूमरवर फक्त शस्त्रक्रियेद्वारेच उपचार होऊ शकतात. त्यामुळे लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कर्करोगाची शक्यता नाकारली असली तरी रक्त चाचणीद्वारे अधिक स्पष्टता मिळणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या वडिलांच्या आजारपणात प्रार्थना केल्या तशाच प्रार्थना दीपिकासाठीही करा. सध्या कोणतेही नकारात्मक विचार न करता फक्त तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा, असंही शोएबने म्हटलं आहे.
दीपिका कक्करने नुकतेच ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’ या शोमध्ये सहभाग घेतला होता, परंतु आरोग्याच्या कारणास्तव तिने शोमधून माघार घेतली होती. ज्यानंतर चाहतेही नाराज झाले होते.
हेही वाचा:
Beed Crime : बीडच्या परळीत गुंडराज…! मुंडे गँगकडून तरुणाचं अपहरण करून अमानुष मारहाण





