भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांना सपाकडून तिकीट? ; अखिलेश यांच्यानंतर आता डिंपल यादव काय म्हणाल्या? वाचा

Dimple Yadav । भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत १९५ उमेदवारांची नावे नुकतीच जाहीर केली आहेत. पक्ष आता दुसरी यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या यादीत भाजपने उत्तर प्रदेशातील ५१ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. या यादीतून पक्षाने अनेक दिग्गजांचा पत्ता कट केलाय. त्याचबरोबर अनेक विद्यमान खासदारांच्या तिकिटांवरही कात्री लावण्यात आली.
कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नव्हते. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांना सपाकडून तिकीट मिळणार असल्याच्या चर्चांवरसध्या सुरु आहेत. या चर्चांवर सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिजभूषण शरण समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याच्या प्रश्नावर त्यांनी, “यात काही तथ्य नसल्याचे म्हटले.
तिकीट देण्याबाबत अखिलेश म्हणाले होते Dimple Yadav ।
या अगोदरअखिलेश यादव यांनी, भाजपचे खासदार त्यांच्या संपर्कात नाहीत, पण तुम्ही असे म्हणत असाल तर आम्ही त्यांना नक्कीच तिकीट देऊ. अशी परिस्थिती उद्भवल्यास पत्रकाराचे म्हणणे मान्य करू. अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली होती.
कैसरगंजमधून उमेदवार जाहीर नाही Dimple Yadav ।
भाजपच्या पहिल्या यादीत ब्रिजभूषण शरण सिंह यांचे नाव नसले तरी पक्षाने कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून कोणालाही उमेदवारी दिलेली नाही. भाजपकडून त्यांचे तिकीट कापले जाऊ शकते. मात्र, ब्रिजभूषण यांच्या जागी पक्ष त्यांची पत्नी केतकी देवी आणि मुलगा प्रतीक भूषण सिंग यांना कैसरगंजमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
महिला कुस्तीगीर आरोपी
महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते आणि त्यांच्याविरोधात आंदोलनही केले होते. यामुळे भाजपची मोठी लाजिरवाणी अवस्था झाली आहे. दरम्यान, भाजपच्या दुसऱ्या यादीतही त्यांचे नाव नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.





