Kiara Advani: बॉलिवूडमधील टॅलेंटेड, सुंदर आणि चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री कियारा अडवाणी हिचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म ३१ जुलै १९९१ रोजी मुंबई येथे झाला.आज ती ३४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अभिनय कारकिर्दीची सुरुवात: कियाराने हिंदी चित्रपटसृष्टीत २०१४ मध्ये ‘फगली’ (Fugly) या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही, मात्र तिच्या सौंदर्याने आणि सहज अभिनयाने ती लक्षात राहिली. त्यानंतर २०१६ मध्ये ‘एम.एस. धोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात तिने महेंद्रसिंग धोनीची पत्नी ‘साक्षी सिंह’ची भूमिका साकारली आणि यामुळे तिला मोठं यश मिळालं. यानंतर तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. कियारा अडवाणीच्या कारकिर्दीला खरी गती मिळाली ती ‘एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’ (२०१६) नंतर. त्यानंतर तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. ‘कबीर सिंग’ (२०१९) मध्ये शाहिद कपूरसोबत तिने काम केलं आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्याच वर्षी आलेल्या ‘गुड न्यूज’ (२०१९) या चित्रपटातही तिची भूमिका लक्षवेधी ठरली. २०२० मध्ये अक्षय कुमारसोबत तिने ‘लक्ष्मी’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात काम केलं. २०२१ मध्ये आलेल्या ‘शेरशाह’ चित्रपटातील तिची ‘डिंपल’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. यानंतर ‘भूल भुलैया 2’ (२०२२), ‘जुगजुग जियो’ (२०२२) आणि ‘सत्यप्रेम की कथा’ (२०२३) या चित्रपटांमधून तिने पुन्हा एकदा आपली अष्टपैलू अभिनयक्षमता सिद्ध केली. प्रत्येक भूमिकेत तिचा नवीन अंदाज बघायला मिळाला आणि बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनली. प्रेमकथा ते लग्न: ‘शेरशाह’च्या शूटिंगदरम्यान कियाराची भेट अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्याशी झाली. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच ऑफस्क्रीन बॉण्डिंगही वाढत गेल. अनेक महिन्यांच्या अफवांनंतर अखेर या दोघांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राजस्थानमधील जाधवगड किल्ल्यावर पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आई झाल्याची आनंदवार्ता: २०२५ मध्ये कियाराच्या आयुष्यात एक गोड वळण आलं. तिला आणि सिद्धार्थला एक गोंडस कन्यारत्न प्राप्त झालं. अभिनेत्री म्हणून प्रचंड यश मिळवल्यानंतर ती आता आई या नव्या भूमिकेचा आनंद घेत आहे. तिने काही काळ कामातून विश्रांती घेत कुटुंबासोबत वेळ घालवणं पसंत केलं आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव: आज तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून तिला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. #HappyBirthdayKiara हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे.