‘बॉर्डर 2’मध्ये दिलजीतची ‘एन्ट्री’

अभिनेता सनी देओलचा ‘बॉर्डर’ हा चित्रपट नक्कीच बॉलिवूडमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. भारतीय लष्कराच्या कथांवर बनवण्यात आलेला हा सर्वात लोकप्रिय चित्रपट आहे. ‘गदर 2’च्या तुफानी यशानंतर सनी देओलने ‘बॉर्डर 2’ची घोषणा केल्यापासून बॉलीवूडचे चाहते या प्रकल्पाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. आता या चित्रपटात असा अभिनेता आला आहे, ज्याचे नाव ऐकताच लोकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता द्विगुणित होईल.
यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला दिलजीत दोसांझ आता ‘बॉर्डर 2’चा भाग बनणार आहे. या धमाकेदार प्रोजेक्टमध्ये दिलजीत सनीच्या खांद्याला खांदा लावून देशासाठी लढताना दिसणार आहे. शुक्रवारी निर्मात्यांनी एका नवीन प्रोमोसह ‘बॉर्डर 2’ च्या कलाकारांमध्ये दिलजीतच्या प्रवेशाची घोषणा केली. प्रोमोमध्ये मूळ ‘बॉर्डर’ चित्रपटातील ‘संदेसे आते हैं’ हे गाणे सोनू निगमच्या आवाजात ऐकू येते आणि त्यानंतर दिलजीतचे नाव लिहिले जाते. या प्रोमोमध्ये, दिलजीतच्या आवाजात एक देशभक्तीपर संवादही आहे – ‘ ‘इस देश की तरफ उठने वाली हर नजर झुक जाती है खौफ से… !
View this post on Instagram
‘दिलजीतने त्याच्या इंस्टाग्रामवर ‘बॉर्डर 2’ ची घोषणाही शेअर केली आहे. प्रोमो शेअर करताना त्याने लिहिले की, ‘शत्रू पहिली गोळी चालवेल आणि शेवटची गोळी आम्ही चालवू! अशा बलाढ्य संघासोबत उभे राहून आपल्या सैनिकांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा मला सन्मान वाटतो.
सनी देओलने जूनमध्ये अधिकृतपणे घोषणा केली होती की तो J.P.D. दत्ताच्या ‘बॉर्डर’ (1997) चित्रपटातून पुन्हा सैनिकाची भूमिका साकारण्यासाठी तयार आहे. या चित्रपटाचा सीक्वल बनवला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना सनीने लिहिले होते, ‘२७ वर्षांपूर्वी एका सैनिकाने परत येण्याचे वचन दिले होते. आता तेच वचन पूर्ण करण्यासाठी भारत मातेच्या मातीला आपला सलाम करण्यासाठी मी परतत आहे.
अधिकृत घोषणा केल्यानंतर मेकर्स ‘बॉर्डर 2’ च्या कास्टची घोषणा करणार आहे. आतापर्यन्त या चित्रपटातील आयुष्मान खुराना आणि वरून धवन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बॉडर २ चित्रपट २ ० २ ५ मध्ये रिलीज होणार आहे.





