पिंपरी | थेरगाव उद्यानातील भगव्या झेंड्याची दुरवस्था

पिंपरी, (प्रतिनिधी) – डांगे चौक थेरगाव येथील, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील, भगव्या झेंड्याची दुरवस्था झाल्यामुळे अनेक नागरिकांच्या भावना दुखवल्या जात आहेत. या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी ग क्षेत्रीय कार्यालय अजिंक्य येळे यांना प्रदीप गायकवाड यांनी जुना झेंडा बदलण्या बाबत कळवले आहे.
उद्यान विभागातील अधिकारी फक्त साफसफाई कडे लक्ष देत असून, त्यांना हा दुरवस्था झालेल्या झेंडा दिसत नाही किंवा ते तुम्हाला सांगत नाही. ह्या उद्यानात पंचक्रोशीतील नागरिक येत असतात.
त्यांना ह्या दुरवस्था झालेल्या झेंड्याची अवस्था पाहवत नाही. तरी तातडीने येथील जुना झालेला झेंडा बदलावा आणि नविन झेंडा बसवावा. येत्या चार दिवसांत येथील झेंडा बदलला नाही तर आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिंचवड विधानसभा मतदारसंघ अजितदादा पवार गट उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी दिला आहे.





