“तु चेहऱ्याची सर्जरी केली का?”; उर्मिला मातोंडकर स्टायलिश लुकमुळे ट्रोल

Urmila Matondkar | बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने ९० च्या काळात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने सिनेइंडस्ट्रीत स्वत: एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र सध्या ती अभिनय क्षेत्रापासून दुर आहे. वयाच्या 51 वर्षानंतर देखील तिचा फिटनेस पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करतात.
नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचा स्टायलिश लुक शेअर केला होता. मात्र या लुकवरून तिला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे.
उर्मिलानं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिनं गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. परंतु, या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी तिच्या चेहऱ्यामध्ये बदल जाणवत असल्याचं म्हटलं आहे. उर्मिलाच्या पोस्टखाली एका नेटकऱ्यानं, ‘तू चेहऱ्यावर काहीतरी केलं आहेस वाटतं’.
दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘ तू तुझ्या चेहऱ्यावर काही केलं आहेस का?’, आणखी एका नेटकऱ्याने ‘तू ओठांची किंवा चेहऱ्याची सर्जरी केली आहेस का?’ ‘हे फोटो AI जनरेटेड आहे का?’, अशी कमेंट केली आहे. तर काहींनी तिच्या लुकचे कौतुकही केले आहे. Urmila Matondkar |
View this post on Instagram
दरम्यान, उर्मिला मातोंडकरने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 1977 मध्ये ‘कर्म’ आणि 1983 मध्ये ‘मासूम’ चित्रपटात तिने काम केले. मात्र, मुख्य अभिनेत्री म्हणून तिने ‘नरसिम्हा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. पण 1995 मध्ये आलेल्या ‘रंगीला’ या चित्रपटामुळे तिला घराघरात ओळख मिळाली. शेवटची ती दिवंगत अभिनेता इरफान खानच्या ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटात दिसली होती. Urmila Matondkar |





