शर्ट आश्रमात विसरला का ? बॉबी देओलचा लूक पाहून फॅन्सही झाले चकित VIDEO

मुंबई – अभिनेता बॉबी देओल आजकाल त्याच्या फिटनेसमुळे चांगलाच चर्चेत असतो. जिममध्ये वर्कआउट करत असताना, तो सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो, जे त्याच्या चाहत्यांनाही खूप आवडतात. आता पुन्हा एकदा बॉबी देओल त्याच्या फिटनेस आणि जबरदस्त बॉडीमुळे चर्चेत आला आला आहे. बॉबीचा विमानतळावरील शर्टलेस व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
व्हिडिओमध्ये तो मुंबई विमानतळाबाहेर असल्याचे समजते. कारमधून उतरताना बॉबी देओल शर्टलेस दिसत आहे. त्याने केवळ बनियन आणि कार्गो पँट घातली आहे. या लूकमध्ये बॉबी देओलची डॅशिंग बॉडी पाहून चाहते देखील त्याच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत.
बॉबी गाडीतून उतरताना केवळ बनियनवर उतरताना दिसत आहे. मीडियाला पोझ दिल्यानंतर बॉबी एक जॅकेट परिधान करतो आणि विमानतळाकडे जायला निघतो. बॉबीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. बॉबीने अद्याप आश्रममधील आपला लूक बदललेला दिसत नाही. आश्रमधील बाबाचा हुबहुबी लूक कॅरी केल्याने फॅन्सला देखील वेब सिरीजची आठवण आल्याचे समजते. शर्ट आश्रमात विसरला का ? अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने एवढा गरीब कसा झालास ? असा प्रश्न विचारला आहे.
View this post on Instagram
बॉबी देओलच्या आगामी प्रोजेक्टबाबत बोलायचे तर तो लवकरच साऊथ सिनेमांमध्ये डेब्यू करणार आहे. बॉबी देओल ‘हरी हरा वीरा मल्लू’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ‘औरंगजेब’ची भूमिका तो साकारणार आहे. यासोबतच चाहते आश्रमाच्या पुढील पर्वाची देखील वाट पाहत आहेत.





