Wagholi News : वाघोलीत भाजप नेत्याने शब्द पाळलाच नाही?
Wagholi News : वाघोली (ता. हवेली) येथील महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीच्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला भरघोस मतांनी विजय करण्यासाठी प्रयत्न केले.

Wagholi News : वाघोली (ता. हवेली) येथील महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीच्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला भरघोस मतांनी विजय करण्यासाठी प्रयत्न केले. (Wagholi News)
याच काळात विजयी उमेदवारांसाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या पक्ष संघटनेमध्ये तातडीने जबाबदारी देण्यात येईल असा शब्द एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. निवडणुका संपन्न होऊन काही महिन्यांचा कालावधी या शब्दाला लोटला आहे. (Wagholi News)
आज संघटनेची जबाबदारी देतो, उद्या देतो असे करत करत वाघोलीतील एका भाजप नेत्याने टोलवाटोलवी सुरू केल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अनेक कार्यकर्त्यांनी काम करून देखील भाजपमध्ये संधी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. (Wagholi News)
वाघोली हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने तसेच राजकीय दृष्टीने महत्त्वाचे बनले असून अनेक पक्षांचे जिल्हास्तरावरचे पदाधिकारी वाघोलीत आहेत. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून कार्यकर्त्यांची देखील एक मजबूत संघटना वाघोली मध्ये निर्माण करण्यासाठी अनेक पक्ष अविरतपणे काम करीत आहे. (Wagholi News)
वाघोली मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी भाजपच्या संघटनेतील वाघोली मधील एका पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना भाजपचे काम करा तुम्हाला संधी दिली जाईल असे आश्वासन दिले होते. वाघोली मधून प्रचंड मताने उमेदवार निवडून आले आहेत. (Wagholi News)
मात्र ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केले त्या कार्यकर्त्यांच्या पदरी अजूनही पक्ष संघटनेतील जबाबदारी न मिळाल्याने वाघोलीच्या भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासन हवेत विरले का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. (Wagholi News)




