सिद्धार्थ-मितालीने दिली गुडन्यूज? फोटोवरील कॅप्शनमुळे चर्चांना उधाण

मुंबई – मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे कपल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेक फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच हे दोघे कामामधून ब्रेक घेऊन पॅरिसला गेले होते. येथील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता पुन्हा हे कपल चर्चेत आले आहे. लवकरच हे कपल गुडन्यूज देणार असल्याचे म्हंटले जात आहे.
मितालीने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावरून ही चर्चा रंगली आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला आहे आणि काळ्या रंगाची हील घातली आहे. यावेळी ती एका बेंचवर बसलेली दिसते. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मॉमीज गेटिंग हॉट’. मितालीच्या याच कॅप्शनमुळे ती लवकरच आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
अनेकांनी कमेंट करत “तू गरोदर आहे का?” असे विचारले आहे. तर अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे. मात्र अद्याप मिताली आणि सिद्धार्थने दोघं आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांवर अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, दोन वर्षे लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर सिद्धार्थ आणि मितालीने 2021 मध्ये लग्नगाठ बांधली होती.





