नेवासा – सद् रक्षणाय…खलनिग्रहणाय बिद्र घेवून जनतेच्या सुरक्षेसाठी ऊन..वारा..थंडीची पर्वा न करता गृहखाते २४ तास जनतेच्या मदत कार्यात सक्रिय सहभागी असतात माञ पोलीसांनाही सतत उल्लू बनविण्याच्या घटनेत नेवासा तालुक्यात चांगलीच वाढ झाल्याने या घटनेचा पोलिसांना मोठा मनस्ताप सहन करण्याच्या घटना सतत घडत आहेत मंगळवार (दि.३१) रोजी राञी पोलीस गस्तीवर असतांना जनतेच्या मदत कार्यासाठी असणाऱ्या डायल ११२ वर कॉल आला की,मी मर्डर केला आहे.
त्यामुळे नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय करे यांनी गस्तीसाठी रवाना झालेल्या पोलीस पथकाला घटनास्थळी पाठवून पोलीस यंञणेने मोठी धावपळ केली राञ जागून काढली माञ मर्डर केला सांगणारा व ज्याचा मर्डर झाला आहे अशी माहीती देणारे ते दोघे गप्पा झोडतांना पोलीसांना मिळून आल्याचा प्रकार उघडकिस आल्यामुळे पोलीसांनी खाकीचा हिसका दाखवताच खोटा कॉल करणाऱ्यांची चांगलीच दमछाक उडाली.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, शिरसगांव (ता.नेवासा) येथे दत्तु लांडे हा इसम जे.सी.बी यंञाच्या साह्याने माती उकरून रस्त्याच्या कडेला व त्याच्या शेत बांधा जवळ पोल लावत असून अतिक्रमण करत आहे अशी माहीती खबर देणाऱ्या अमोल लंघेंनी पोलीसांना दिल्यावर पोलीस लवकर येणार नाहीत ? म्हणून चक्क मी मर्डर केला आहे अशी खोटी माहीती डायल ११२ वर देवून पोलीसांना उल्लू बनवून पोलीसांची धावपळ केली पोलीस घटनास्थळी आल्यावर कोणतीही अनुचित घटना घडलेली नसल्यामुळे पोलीसांचा चांगलाच पार चढला खाकीचा हिसका दाखवताच खोटी माहीती देवून पोलीसांना उल्लू बनविणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली व खोटी खबर देणाऱ्यांना बिन भाड्याच्या सरकारी वाहनात पोलीसांनी आणून चांगलाच समाचार घेतला.
डायल ११२ कॉर्लरचा दुरोपयोग
अनुचित घटना घडल्यास पोलीस घटनास्थळी लवकर येवून मदत कार्य करु शकतील यासाठी ११२ कॉर्लरचा उपयोग होत असतांना नेवासा तालुक्यात पोलीस मदत कार्यासाठी असलेल्या यंञणेलाच काही ठक उल्लू बनवू पहात आहेत त्यामुळे पोलीस यंञनेला मनस्ताप सहन करण्याची हाकनाक वेळ येत असल्यामुळे खाकीचा दणका दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.