‘धुरंधर’चे डोंबिवलीत शूटिंग; संजय दत्त आणि रणवीर सिंगचा रावडी लुक समोर

Dhurandhar Film Shoot | अभिनेता संजय दत्त आणि रणवीर सिंग यांची भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ सिनेमाची अपडेट समोर आली आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग मुंबई, नवी मुंबई, डोंबिवली या भागात सुरू आहे. नुकतेच डोंबिवलीतील माणकोली पुलावर शूटिंगदरम्यानचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
शूटसाठी माणकोली पूल दोन दिवस बंदही ठेवण्यात आला आहे. पूलावर अनेक गाड्या दिसत आहेत आणि कलाकारांची फौज आहे. त्यातच एक कार पाण्यात पडतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी संजय दत्तही येथे उपस्थित होता. या सिनेमातील त्याचा लुक समोर आला आहे. Dhurandhar Film Shoot |
View this post on Instagram
तर आणखी एका व्हिडीओमध्ये रणवीर सिंह ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. यात त्याचा नवीन लूक समोर आला आहे. लांब दाढी, वाढलेले केस, काळे कपडे अशा लूकमध्ये तो दिसत आहे. हा व्हिडिओ अमृतसरमधील असल्याचे म्हंटले जात आहे. ‘धुरंधर’चे हे व्हायरल व्हिडिओ बघून चाहत्यांनी हा सिनेमा ‘ब्लॉकबस्टर’ होणार असल्याचे जाहीर केले आहे. Dhurandhar Film Shoot |
View this post on Instagram
‘धुरंधर’ चित्रपट आदित्य धर यांनी दिग्दर्शित केला आहे. यात रणवीर सिंहसोबत यामी गौतम, अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल हे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. मात्र हा सिनेमा कधी रिलीज होणार? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Dhurandhar Film Shoot |
हेही वाचा:
“पाकिस्तानची ७५ वर्षे जगून झाली, आता त्यांचे फार दिवस…”; CM योगी आदित्यनाथांचा इशारा





