बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले,’मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कारण…’

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते मात्र, राज्य सरकारच्या विनंतीनंतर जरांगे-पाटलांनी दोन महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून सर्वच क्षेत्रातील व्यक्ती आपली मत मांडताना दिसत आहे, अशात बागेश्वर धामचे अध्यात्मिक गुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी भाष्य केलं आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अयोध्यानगरी येथे ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली, ते म्हणाले,’मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कारण जेव्हा देश गुलामगीरीत होता, तेव्हा शौर्याने स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम मराठा समाजानं केलं. सरकारनं मराठा समाजाशी चर्चा करून आरक्षण दिलं पाहिजे. बागेश्वर पीठ मराठा समाजाबरोबर आहे.” असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, आज माध्यमांशी बोलतांना मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मुद्यावरून सरकारवर टीका केली, ते म्हणाले मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले. मराठा तरूणांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातंय, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. त्यांनी ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. मराठ्यांच्या पोरांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. असेही ते म्हणाले आहे.





