धर्मेंद्र यांची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली; हेमा मालिनी प्रार्थना सभेत भावूक, म्हणाल्या ” मी त्यांना अनेकदा…”

Actress and MP Hema Malini : बॅालीवूड डंडस्ट्रीचे ‘ही मॅन’ धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबतच्या आठवणी उजाळला दिला. धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर साधारण १७ दिवसांनी गुरुवारी अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी दिल्लीत त्यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते.
या पार्थना सभेला कुटुंबीय, राजकीय नेते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. या सभेत बोलताना हेमा मालिनी भावूक झाल्या होत्या. “आजच्या या प्रार्थना सभेत तुम्हा सर्वांचे स्वागत करताना मी खूप भावूक होत आहे. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, माझ्या आयुष्यात असा दिवस येईल, जेव्हा मला माझ्या धर्मजींसाठी शोकसभा आयोजित करावी लागेल. जग त्यांच्या जाण्याचे दुःख व्यक्त करत आहे, पण माझे दुःख त्याहून कितीतरी खोल आहे,” असे त्या बोलताना म्हणाल्या.
‘ती’ इच्छा अधुरीच
या प्रार्थना सभेत बोलताना हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचे एक अपूर्ण राहिल्याचे सांगितले. धर्मेंद्र यांचे उर्दू कवितेचे पुस्तक लिहिण्याचे आणि प्रकाशित करण्याचे स्वप्न होते ते आता अपूर्ण राहिले असल्याचे हेमा मालिनी यांनी सांगितले. “कालांतराने, जेव्हा त्यांनी उर्दू कविता लिहायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक लपलेला पैलू समोर आला. त्यांची खासियत अशी होती की परिस्थिती काहीही असो, ते एक-एक ओळी योग्यरित्या म्हणायचे, अशी आठवणही त्यांनी शेअर केली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मी त्यांना अनेकदा म्हणाले की त्यांनी एक पुस्तक लिहावे. त्यांच्या चाहत्यांना हे पुस्तक आवडले असते. ते याबद्दल खूप गंभीर होते आणि सर्व काही नियोजन करत होते. पण आता हे स्वप्न अपूर्ण राहिले, असे हेमा मालिनी सांगत असताना भावूक झाल्या होत्या.





