Posted by Hema Malini : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बॅालिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. तर काहींनी त्यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणी सोशल मीडिया पोस्टमधून शेअर केल्या. बिग बी अमिताभ बच्चन यांनी जीवलग मित्राला गमावल्यानंतर भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. आता धर्मेंद्र यांच्या निधनाच्या चार दिवसांनी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील ही मॅन अशी ओळख लाभलेले धर्मेंद्र यांचे वृद्धपकाळाने 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. हेमा मालिनी यांनी ट्वीट करत फोटोसोबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे. “धरमजी… हे माझ्यासाठी खूप काही होते. माझा प्रेमळ पती, आमच्या दोन मुली इशा आणि अहानचे लाडके वडील, मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक, कवी, आणि मला गरज वाटेल अशावेळी माझा आधार. खरंतर ते माझ्यासाठ सगळंच होते”. अशा शब्दांत हेमा मालिनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. Dharam ji❤️ He was many things to me. Loving Husband, adoring Father of our two girls, Esha & Ahaana, Friend, Philosopher, Guide, Poet, my ‘go to’ person in all times of need – in fact, he was everything to me! And always has been through good times and bad. He endeared himself… pic.twitter.com/WVyncqlxK5 — Hema Malini (@dreamgirlhema) November 27, 2025 चांगल्या-वाईट काळात ते नेहमी माझ्या सोबत उभे राहिले. त्यांच्या सहज, आत्मीय वागण्यामुळे त्यांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाचे मन जिंकले, त्यांच्यावर प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचा वर्षाव केला. एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून, त्यांची प्रतिभा, लोकप्रियतेनंतरही असलेली त्यांची विनम्रता अशा सर्व गोष्टींमुळे ते एक अद्वितीय आणि अप्रतिम व्यक्ती होते, असे हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दल लिहिले आहे. आता फक्त या खास क्षणांना जपायचं आहे पुढे त्यांनी लिहिले आहे की, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर माझा जो वैयक्तिक लॅास आहे त्यांचं वर्णन करता येणार नाही. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीच भरता येणार नाही. अनेक वर्षांच्या सहजीवनानंतर, आता माझ्याकडे फक्त आठवणीच उरल्या आहेत. आता फक्त या खास क्षणांना जपायचं आहे, असे म्हणत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दल असलेल्या भावनांना वाट मोकळी केली. हेमा मालिनींच्या दु:खद पोस्टवर चाहते कमेंट्स करत शोक व्यक्त करत आहेत. हेही वाचा : हाँगकाँगमधील भीषण आगीत 44 जणांचा मृत्यू, ३०० पेक्षा जास्त बेपता ; ३ संशयितांना अटक