Dharmendra: ‘आप मेरे लिए पिता समान’…असं म्हणत, शाहरुख खानची धर्मेंद्र यांना श्रद्धांजली!

Dharmendra: दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण चित्रसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडपासून ते दक्षिणेपर्यंत सर्वच कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे किंग खान शाहरुख खान यांनीही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले.
‘धरम जी, आपण अमर आहात’ : शाहरुख
शाहरुख यांनी इंस्टाग्रामवर धर्मेंद्र यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला असून त्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, “RIP धरम जी. आपण माझ्यासाठी वडिलांसारखे होता. आपण दिलेल्या आशीर्वाद आणि प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. ही हानी फक्त त्यांच्या कुटुंबासाठीच नाही, तर जगभरातील सिनेप्रेमींसाठीही आहे. आपण अमर आहात. आपली आत्मा आपल्या चित्रपटांमधून आणि आपल्या सुंदर कुटुंबामधून सदैव जिवंत राहील. आपल्यावर नेहमीच प्रेम करत राहीन.”
View this post on Instagram
अंतिम संस्काराला शाहरुख खान उपस्थित
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. शाहरुख खान यांनाही श्मशानभूमीबाहेर पाहिले गेले. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण यांसह अनेक कलाकारांनी दिवंगत अभिनेत्याला अंतिम निरोप दिला.
२५ डिसेंबरला येणार धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट
धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ या नावाने प्रदर्शित होणार असून तो २५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अगस्त्य नंदा दिसणार आहेत. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता आहे.





