Dharashiv News : धक्कादायक! आईसह विवाहित मुलीने नैराश्यातून उचलले ‘हे’ पाऊल

धाराशिव : धाराशिवमधून (Dharashiv News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आईसह विवाहित मुलीने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात (Dharashiv News) मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिट्ठीदेखील आढळून आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
तुळजापूर येथील हडको भागात असलेल्या लिटिल फ्लॉवर्स शाळेत संजय पवार हे मुख्याध्यापक आहेत. मंगळवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेले. यानंतर त्यांच्या गवते प्लॉटिंग येथील घरी पत्नी रत्नमाला पवार आणि विवाहित मुलगी प्रतीक्षा पाटील यांनी एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. रात्री 9.30 वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मृत प्रतीक्षा पाटील (वय 23) हिचा सोलापूर जिल्ह्यातील सापटणे येथील एका शेतकरी तरुणाशी वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता.
शेजाऱ्यांकडे दिली घराची चावी
रत्नमाला पवार आणि प्रतीक्षा पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या घराचा दरवाजा बंद न करता तो पुढे लोटला आणि दुसऱ्या गेटला कुलूप लावले. घराची चावी शेजाऱ्यांकडे दिली आणि त्यांना बाहेर जात असल्याचे सांगितले. त्यानंतर फक्त पुढे केलेल्या दुसऱ्या दरवाजाने त्यांनी घरात प्रवेश केला आणि एकाच दोरीने माय-लेकीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनास्थळी सापडली सुसाईट नोट
पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा त्यांना घटनास्थळी चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये प्रतीक्षा पाटील हिला पुढील शिक्षण घ्यायचे होते. मात्र, शिक्षण बंद करून तिचा विवाह शेतकरी मुलासोबत लावून देण्यात आल्याची खंत व्यक्त केली आहे. याच नैराश्यातून या मायलेकींनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समजत आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे (Dharashiv News) परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





