Pune | धंगेकरांनी घडविले माणुसकीचे दर्शन

प्रभात वृत्तसेवा
पुणे, – निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात असतानाच रणधुमाळीतून वेळ काढत कसबा विधानसभा मतदारासंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा आपल्या कामाच्या माध्यमातून माणुसकीचे दर्शन घडवून दिले. नीलायम टॉकीजजवळील वस्तीत राहणाऱ्या एका रुग्णाला त्याच्या घरी जाऊन ऑक्सिजनचे मशीन पुरवले.
नीलायम टॉकीजजवळील एका वसाहतीमध्ये एका गरजू रुग्णाला त्याचे ऑक्सिजन पुरवठा करणारे मशीन बिघडल्याने श्वसनाला त्रास होत होता. पण, गरिबीमुळे त्याला नवीन मशीन तातडीने घेता येत नव्हते. ही माहिती समजताच आमदार रवींद्र धंगेकर स्वतः ऑक्सिजनचे नवीन मशीन घेऊन त्याच्या घरी पोहोचले आणि त्याला ही मदत दिली. अचानक न मागता मिळालेल्या या मदतीमुळे या रुग्णाच्या डोळ्यात अश्रू तरळले. तेथील अन्य रहिवाशांनीही या प्रकारामुळे धंगेकर यांना भरभरून धन्यवाद दिले.
धंगेकरांना पुन्हा विधानसभेत पाठवा
आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना- ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजेंद्रनगर व दांडेकर पूल परिसरात धंगेकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप- महायुती सरकारवर जोरदार टीका केली. पुण्यात मादक द्रव्य तस्करीची मोठी साखळी धंगेकर यांच्यामुळेच उघडकीला आली. त्यामुळे येथील नागरिकांनी आपली जबाबदारी समजून धंगेकर यांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवले पाहिजे, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी यावेळी केले. यावेळी आमदार धंगेकर यांच्या पत्नी सौ. धंगेकर, सौ. मारटकर, अनिल यनपुरे, चंदन साळुंखे, अनिल धिमधिमे, उमेश गालिंदे, संदीप गायकवाड उपस्थित होते.
Remarks :





