“पुढील चार महिन्यांत धनंजय मुंडेंची आमदारकीही जाणार”; नेमका कोणी केला दावा?

Dhananjay Munde | संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यानंतर त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर आता मुंडे यांची आमदारकी पुढील चार महिन्यांत जाणार असल्याचा दावा करुणा मुंडे यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्या घरावर केलेल्या दाव्यावरून त्यांनी हा दावा केला आहे.
करुणा मुंडे काय म्हणाल्या?
करुणा मुंडे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मुंबईतील घरावर दावा केला आहे. “दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी माझ्या घरावर हक्क सांगितला होता. त्यांनी हे घर माझं असून घराचा 15 लाखांचं मेंटेनन्स रखडला आहे. आता मला हे घर विकायचे आहे आणि कर्ज फेडायचे असे म्हणत हक्क दाखवला आहे.”
पुढे त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडे हे घरावर हक्क सांगते असले तर ते घर त्यांचे नाही माझ्या सासऱ्यांचे आहे आणि त्यावर माझाही आणि माझ्या मुलांचा हक्क आहे, पण धनंजय मुंडे खालच्या पातळीवर जाऊन कृत्य करत आहे. त्यांनी हवं तर सरकारी बंगला सोडावा आणि माझ्या घरात येऊन राहावे कारण ते घर त्याचंही आहे, असेही पुढील चार महिन्यांत त्यांची आमदारकीही जाणार आहे,” असा थेट दावाच त्यांनी केला आहे. Dhananjay Munde |
पंकजा मुंडेंवरही हल्लाबोल
करुणा मुंडेंनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही हल्लाबोल केला. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे बीडमध्ये जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंकजा मुंडेंप्रमाणेच धनंजय मुंडेंचं देखील रस्सी जल गयी, लेकीन बल नही गया असंच आहे, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडेवर निशाणा साधला. Dhananjay Munde |
हेही वाचा :





