धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली हॉस्पिटल मध्ये भेट

मुंबई: राष्ट्रवादी नेते, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
असे सांगण्यात आले आहे की, धनंजय मुंडे यांना सायंकाळच्या सुमारास छातीत वेदना जाणवू लागल्या. हा हृदयविकाराचा सौम्य झटका असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ब्रीच कँडी रुग्णालायात पोहोचले होते.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. धंनजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवास इ. मुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली आहे.@dhananjay_munde @NCPspeaks
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 13, 2022
याबाबत राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे की,“राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवास इत्यादीमुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली आहे,” असं टोपे यांनी ट्विट करुन सांगितलं आहे.





