Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना दिलासा; ‘त्या’ प्रकरणात क्लीनचीट, अजंली दमानियांना धक्का
Dhananjay Munde: मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या बाजूने निकाल दिला व संबंधितांचे आरोप फेटाळून लावल्यानंतर अंजली दमानिया यांनी राज्य लोक आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती.

Dhananjay Munde: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह वेगवेगळ्या आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप राज्य लोक आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत.
धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी योजनेंतर्गत विशेष कृती कार्यक्रम राबवून त्याअंतर्गत नॅनो खते, कापूस बॅग, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आदी साहित्य खरेदी करण्यात आले होते. त्यामध्ये अनियमितता करून शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता.
या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या बाजूने निकाल देत संबंधितांचे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर अंजली दमानिया यांनी राज्य लोक आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. Dhananjay Munde
आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही
या तक्रारीवर आता लोकायुक्तांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून आपलं निरीक्षणं नोंदवलं आहे. कृषी खरेदी प्रकरणाबाबत या संदर्भात उच्च न्यायालयाचा आदेश अस्तित्वात असल्याने आणि संबंधित याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितलेली नसल्यानं, उच्च न्यायालयाचा आदेश लोकायुक्तांवर बंधनकारक आहे. तसेच प्रकरणातील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून सदर आरोप फेटाळून लावत असल्याचे आपल्या निकालामध्ये स्पष्ट केले आहे.
उच्च न्यायालयाने या निकालामध्ये नोंदविलेली निरीक्षणे ही स्वयंस्पष्ट, निर्णायक व शासनाच्या धोरणाला अनुसरून असल्याने तसेच याचिकाकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे संबंधित याचिकेमध्ये जोडलेल्या बाबींव्यतिरिक्त, बनावट पुरावे असून कुठलाही ठोस पुरावा किंवा दखल घेण्यायोग्य काहीही नसल्याने यामध्ये आणखी वेगळी सुनावणी घेण्याचा कोणताही मुद्दा शिल्लक राहत नाही, असेही लोकायुक्तांनी आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात देखील संविधानातील ठराविक काही कलमे, लोकप्रतिनिधीत्व कायदा, लोकप्रतिनिधींच्या हक्कांचे संरक्षण यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास केला असून, लोक आयुक्तांच्या अखत्यारीतील कोणताही ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा किंवा त्या अनुषंगाने कुठलाही आरोप सिद्ध होत नाही.
तसेच याचिकाकर्ते अंजली दमानिया यांनी याबाबत देखील कुठलाही महत्त्वाचा नवीन पुरावा त्यांच्या पुरवणी जबाबात देखील सादर केलेला नाही. त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिट चा मुद्दा हा देखील निकाली काढला असून, त्यातही धनंजय मुंडे यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.
अंजली दमानियांनी काय आरोप केले होते?
दरम्यान, अंजली दमानिया मागील एका वर्षापासून धनंजय मुंडे यांच्या विरोधात काही आरोप करत आहेत. मात्र उच्च न्यायालयानंतर लोकायुक्तांनी देखील सदर आरोप फेटाळून लावल्याने अंजली दमानिया यांना झटका बसलाय.
हेही वाचा:
Iran-Israel war: शेकडो इराणी नागरिकांचे तुर्कीकडे स्थलांतर; सीमेवर निर्वासितांच्या रांगा






