धनंजय मुंडे तब्बल 12 वर्षांनंतर भगवान गडावर दाखल ; महंत नामदेव शास्त्री यांच्या पायावर टेकवलं डोकं

Dhananjay Munde -Pankaja Munde Dasara Melava 2024। आजच्या विजयादशमीच्या निमित्ताने राज्यात होणाऱ्या दसरा मेळाव्यातील एक मेळावा आज मराठवाड्यात पार पडत आहेत. मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे तब्बल 12 वर्षांनंतर आज भगवान गडावरील दसरा मेळाव्यात एकत्र आले आहेत. त्यांच्या एकत्र येण्याने आता दोघे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर मुंडे घराण्यात फुट पडली होती. त्यानंतर 2014 साली गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. त्यानंतर आतापर्यंत पंकजा मुंडे यांच्या उपस्थित हा दसरा मेळवा पार पडत होता.
2023 मध्ये अजित पवार यांनी 2023 मध्ये महायुतीत येण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा अनेकदा एकत्रित पाहायला मिळाले. मात्र आज धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच भगवान गडावरील दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली आहे.
धनंजय मुंडे भगवान गडावर दाखल झाले आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांनी भगवान गडावरील श्री संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या दर्शनानंतर धनंजय मुंडे यांनी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची देखील भेट घेतली. यावेळी नामदेव शास्त्री यांच्या पायावर डोकं ठेवत धनजंय मुंडे यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.





