धनंजय मुंडेंना शासकीय बंगला रिकामा करण्याचे आदेश; भुजबळांना मिळणार निवासस्थान

Dhananjay Mundhe – माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आज सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत सातपुडा हे शासकीय निवासस्थान रिकामे करण्याचे आदेश नोटीस काढून बजावले असल्याने अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना आता सरकारी निवासस्थान मिळणार आहे.
आज राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मुंडे यांना हे आदेश एका नोटिसीद्वारे दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत मुंडे यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. तथापि त्यांनी मागितलेल्या मुदतवाढीला अद्यापतरी लिखीत स्वरुपात मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून किंवा शासनाच्या वतीने लिखीत स्वरुपातील उत्तर मिळालेले नाही.
त्यामुळे मिळालेल्या नोटीसीप्रमाणे मुंडे लवकर बंगला रिकामा करतील असे वाटत नाही. सरपंच हर्षवर्धन देशमुख यांच्या हत्येस जबाबदार असलेल्या वाल्मिकी कराडचा आका म्हणून धनंजय मुंडेंचे नाव काही काळ घेतले जात असून एसआयटीच्या तपासा त मूंडे यांचे नाव आले.
त्यानंतर मुंडेंवर विरोधकांनी टीकेचे जहरी प्रहार केले.अखेरीस मुंडे यांना त्यांच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा फेब्रुवारी महिन्यात द्यावा लागला होता. त्यानंतर तब्बल सात महिने मुंडे यांनी शासकीय निवासस्थान सोडले नव्हते.





