Dhananjay Munde-Ajit Pawar । बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावरुन राज्यात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच या प्रकरणी शासनाने नवीन एसआयटी गठीत केली आहे. तर त्याअगोदर धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले तर त्याच्या, दुसरीकडे वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळीत आंदोलन केले. एवढे नाही तर आता वाल्मिक कराडच्या आई आणि पत्नी दोघीनी काल दिवसभर आंदोलन केले होते.आता सर्व घडामोडीत परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी नुकतेच देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली आहे. सध्या त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे. धनंजय मुंडे-अजित पवार यांच्यात १० मिनिटं चर्चा Dhananjay Munde-Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्री धनंजय मुंडे यांनी देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. ही भेट केवळ 10 मिनिटांची झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अजित पवार यांची भेट घेऊन सध्याची परळीतील परिस्थितीबाबत त्यांना माहिती देऊन मुंडेंनी थेट परळीचा रस्ता धरला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्याची परिस्थिती शांत झाल्यानंतर आपण परळीमध्ये पुढील 2 दिवसांत माध्यमांशी संवाद साधू अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी माध्यमांना दिली आहे. अजित पवारांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे थेट परळीला रवाना झाले आहेत.कालचा सर्व घटनाक्रम पाहता परळीतील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती लक्षात घेऊन धनंजय मुंडे तातडीने परळीला रवाना झाल्याचं सांगण्यात आलं. वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी Dhananjay Munde-Ajit Pawar । वाल्मिक कराडला काल न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे, खंडणी प्रकरणात त्याच्या जामीनचा मार्ग मोकळा झाला असला तरी सीआयडीने मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. वाल्मिकवर मकोका दाखल केल्यानंतर परळीत त्याच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. वाल्मिक कराडच्या आईनेही रस्त्यावर उतरुन लेकावर दाखल केलेले गुन्हे खोटे असल्याचं म्हटलं. तर, वाल्मिक कराडची पत्नी मंजिली यांनीही पत्रकारांशी संवाद साधत एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. तेली हे आष्टीचे जावई असून त्यांचे आणि आमदार सुरेश धस यांचे सीडीआर तपासावे, अशी मागणी त्यांनी केली. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेऊन परळीची वाट धरली असल्याचे सांगण्यात येत आहे.