मुख्यमंत्र्यांचे मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश ; धनंजय देशमुख म्हणाले,”हे सगळं राजकीय…”

Dhananjay Deshmukh on Dhananjay Munde । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींनी काढलेले फोटो काल आरोपपत्रातून समोर आले होते. या आरोपपत्रातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली.या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. या बैठकीत मंत्री धनंजय मंडे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. ही माहिती समोर येताच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंडेंच्या राजीनाम्यावर धनंजय देशमुख काय म्हणाले ? Dhananjay Deshmukh on Dhananjay Munde ।
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारलं असता त्यांनी,”याच्यावर मला काहीच बोलायचं नाही, आतापर्यंत दोन महिन्यात जी तकलीफ झाली. याच राजकीय पाठबळानं आम्हाला धमकावण्यात आलं. आरोपी इथं आल्यावर त्याचं समर्थन करण्यात आलं, मोर्चे काढण्यात आले. ही नैतिकता होती त्यांची खरं तरं, आरोपींना समर्थन करु नका, आरोपींचं मनोबल वाढवू नका, का नाही केलं असं. म्हणून मला त्या गोष्टीवर काहीच बोलायचं नाहीये,”असे म्हटले आहे.
याच्यावर बोलणं हे पालथ्या घड्यावर पाणी घालण्यासारखं Dhananjay Deshmukh on Dhananjay Munde ।
पुढे बोलताना त्यांनी,”सगळं राजकीय पाठबळानं आतापर्यंत केलं आहे. राजकीय पाठबळ देणाऱ्याला ही गोष्ट माहिती आहे. हे बीडला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं याच्यावर बोलणं हे पालथ्या घड्यावर पाणी घालण्यासारखं आहे,”असे धनंजय देशमुख यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान , संतोष देशमुख यांच्या हत्येचे १५ फोटो आणि ३ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच बीड बंदची हाक देखील देण्यात आली आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत .





