Dhading Accidetnt: भीषण अपघात ! नेपाळमध्ये बस नदीत कोसळून १८ जणांचा मृत्यू ; २५ जण गंभीर जखमी
Dhading Accidetnt: नेपाळमध्ये सोमवारी पहाटे भीषण बस अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. धाडिंग येथे झालेल्या भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला

Dhading Accidetnt: नेपाळमध्ये सोमवारी पहाटे भीषण बस अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. धाडिंग येथे झालेल्या भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रवासी बस नदीत पडल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे खळबळ उडाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही बस पोखराहून काठमांडूला जात होती.
सोमवारी पहाटे धाडिंगमधील त्रिशुली नदीत कोसळली, ज्यामुळे किमान १८ जणांचा मृत्यू झाला. बेनीघाट रोरांग ग्रामीण नगरपालिकेच्या वॉर्ड ३ मधील चरौंडीजवळील चिंधरा येथे १:१५ वाजता बस नदीत कोसळली.
धाडिंग जिल्हा वाहतूक पोलिस कार्यालयाचे प्रमुख शिशिर थापा यांच्या माहितीनुसार, मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे. दरम्यान, महामार्ग बचाव व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार ठाकूर यांनी सांगितले की, २५ जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. बसमध्ये ३५ हून अधिक प्रवासी होते.
हा मोठा अपघात कसा घडला? Dhading Accidetnt:
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, बस पोखराहून काठमांडूला जात असताना, वाटेत चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती त्रिशुली नदीत कोसळली. हा अपघात पहाटे १:१५ च्या सुमारास झाला. बस धाडिंग जिल्ह्यातील बेनीघाट रोरंक परिसरातून जात होती. अपघाताच्या कारणाबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही.
अधिकाऱ्यांनी अपघाताबद्दल काय म्हटले? Dhading Accidetnt:
धाडिंग येथील जिल्हा वाहतूक पोलिस कार्यालयाचे प्रमुख शिशिर थापा यांनी सांगितले की, मृतांचा आकडा १८ वर पोहोचला आहे. महामार्ग बचाव व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार ठाकूर यांनीही या घटनेवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, २५ जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बसमध्ये ३५ हून अधिक प्रवासी होते. रात्रीच्या वेळी केलेले बचावकार्य खूपच कठीण होते.मात्र , नेपाळी सैन्य, सशस्त्र पोलिस दल, नेपाळ पोलिस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने सर्वांना वाचवण्यात आले. हे लक्षात घेतले पाहिजे की नेपाळमध्ये यापूर्वीही असेच अपघात अनेक वेळा घडले आहेत.






