Dewald Brevis : डेवॉल्ड ब्रेव्हिसचा कसोटी पदार्पणात धमाका! दक्षिण आफ्रिकेसाठी केला मोठा पराक्रम

Dewald Brevis Explosive Test Debut : दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिसने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केले आहे. झिम्बाब्वेविरुद्ध बुलावायो येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात त्याला पदार्पणाची कॅप मिळाली. तो दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेट खेळणारा ३७० वा खेळाडू आहे. ब्रेव्हिस आपल्या विस्फोटक फलंदाजी साठी प्रसिद्ध असला, तरी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ४१ पेक्षा जास्त आहे. आपल्या पदार्पण कसोटी सामन्यातही ब्रेव्हिसने आपली छाप पाडली आहे.
ब्रेव्हिसने अवघ्या ३८ चेंडूत ठोकले अर्धशतक –
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. २३ धावांवर त्यांचे पहिले तीन फलंदाज बाद झाले. त्यानंतर ५५ धावांवर चौथा गडी बाद झाला, तेव्हा डेवॉल्ड ब्रेव्हिस खेळपट्टीवर आला. त्याने येताच गोलंदाजांवर आक्रमण सुरू केले. केवळ ३८ चेंडूंवर ब्रेव्हिसने आपले अर्धशतक पूर्ण केले. २२ वर्षीय ब्रेव्हिसने ४१ चेंडूंत ५१ धावांची खेळी साकारताना ३ चौकार आणि ४ षटकार ठोकले. विशेष म्हणजे, त्याने व्हिन्सेंट मसेकेसाच्या एकाच षटकात तीन षटकार मारले. मात्र, ५१ धावांवर तो बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पणात सर्वात जलद अर्धशतक –
FIFTY ON TEST DEBUT FOR DEWALD BREVIS! 💥
– 41 balls, 3️⃣ fours, 4️⃣ sixes — pure fireworks from Baby AB! 👶🔥
What a way to announce yourself in red-ball cricket! 👏🇿🇦#DewaldBrevis #TestDebut #BabyAB #ProteaFire pic.twitter.com/GCU8kXf2W6
— Akaran.A (@Akaran_1) June 28, 2025
डेवॉल्ड ब्रेव्हिसने डेब्यू कसोटी सामन्यात सर्वात जलद अर्धशतक ठोकून दक्षिण आफ्रिकेसाठी विक्रम नोंदवला आहे. जागतिक पातळीवर बोलायचे झाल्यास, आतापर्यंत फक्त तीन खेळाडूंनी पदार्पणाच्या कसोटी सामन्यात यापेक्षा कमी चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आहे. पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम न्यूझीलंडच्या टिम साउदीच्या नावावर आहे. २००८ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटी सामन्यात अवघ्या २९ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.
हेही वाचा – IND vs ENG : ‘सचिन सरांच्या व्हिडीओंमुळे टीम इंडियात कमबॅक…’, शफालीची सचिनप्रेरित यशोगाथा, पाहा VIDEO
पदार्पणाच्या कसोटीत सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे फलंदाज :
- टिम साउदी – २९ चेंडू
- ल्यूक रॉन्ची – ३७ चेंडू
- जेकब बेथेल – ३७ चेंडू
- डेवॉल्ड ब्रेव्हिस – ३८ चेंडू
- डेसमंड हेन्स – ३८ चेंडू
डेवॉल्ड ब्रेव्हिस पहिल्यांदा २०२२ च्या अंडर-१९ विश्वचषकादरम्यान चर्चेत आला होता. त्यानी स्पर्धेतील ६ सामन्यांत ८४ च्या सरासरीने आणि ९० च्या स्ट्राइक रेटने ५०६ धावा केल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाला ४०० धावांचा टप्पा देखील गाठता आला नव्हता. त्याच्या फलंदाजीची शैली बऱ्याच अंशी एबी डिव्हिलियर्ससारखी होती. याच कारणामुळे त्याला ‘बेबी एबी’ हे टोपणनावही मिळाले. तथापि, सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे त्यांचे करिअर काहीसे डगमगले देखील होते.





