जगन्नाथ मंदिरात भाविकांना सभ्य पोषाखात येण्याची सुचना ! मंदिराचे मुख्य प्रशासक म्हणतात,”मंदिर प्रशासनाने कपड्यांची..”

नवी दिल्ली – पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर (shree Jagannath temple) प्रशासनाने 1 जानेवारी 2024 पासून शॉर्टस, पारदर्शक आणि उघड कपडे, फाटलेल्या जीन्स आणि इतर अयोग्य पोशाखांमध्ये येणाऱ्या लोकांना प्रवेशापासून रोखण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने कोणताही विशिष्ट ड्रेस कोड अंमलात आणला नसला तरी, त्यांनी पुरुषांसाठी पॅंट, शर्ट, चुडीदार-पंजाबी आणि धोती तर महिलांसाठी साड्या, सलवार कमीज असे सभ्य पोषाख घालून येण्याचे आवाहन केले आहे. (Devotees are instructed to come in decent)
मंदिराचे मुख्य प्रशासक रंजनकुमार यांनी सांगितले की, मंदिर प्रशासनाने कपड्यांची कोणतीही सचित्र यादी निश्चीत केलेली नसली तरी, सभ्य आणि योग्य पोशाख जसे की पॅंट, शर्ट, चुडीदार-पंजाबी आणि धोतर इत्यादी परिधान करावेत हे आम्ही भाविकांच्या विवेकावर सोडतो.
महिलांसाठी साडी, सलवार कमीज अशा स्वरूपाचा पोषाख हवा. भारतातील आणि परदेशातील विविध धर्मांच्या देवस्थानांचे भक्तांसाठी स्वतःचे ड्रेस कोड आहेत, पुरीमध्येही ते लागू करण्याची मागणी विद्वान, संशोधक, पुजारी आणि भगवान जगन्नाथाचे भक्त करत आहेत असे ते म्हणाले.
चड्डी, पारदर्शक आणि शरीर उघडे ठेवणारे कपडे, फाटलेल्या आणि रॅग्ड जीन्स अशा इतर अयोग्य पोशाखांमध्ये येणाऱ्या लोकांना आम्ही परावृत्त करण्याचे ठरवले आहे असेही रंजनकुमार याबाबतची माहिती देताना म्हणाले.





