देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? खास फोटोशूटमुळे चर्चांना उधाण

Devoleena Bhattacharjee | अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीला ‘गोपी बहू’ म्हणून घराघरात ओळख मिळाली. नुकतेच तिने नवरात्रोत्सवानिमित्त खास फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र हे फोटो पाहिल्यानंतर ती पुन्हा प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाल्या आहे
घटस्थापनेच्या दिवशी देवोलीनाने बंगाली लूक साकारला आहे. बंगाली स्टाईल साडी, कपाळावर लाल कुंकू, मोकळे केस, सोन्याचे दागिने परिधान तिने केले आहेत. तिच्या हातात दिवा आहे आणि त्याकडे बघत तिने पोज दिली आहे. तर तिचा दुसरा हात तिने पोटावर ठेवला आहे. यात तिचा बेबी बंप दिसत आहे. यावरुनच देवोलीना दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
देवोलिनाने भट्टाचार्जीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, “माता दुर्गाचं धरतीवर आगमन झालं आहे. हे महालय सर्वांच्या आयुष्यात शक्ती, सकारात्मकता आणि आनंद घेऊन येवो. प्रेम आणि सद्भावनेने या सणाची सुरुवात करुया. शुभ महालया!” बेबी बंप पाहून देवोलिनाचं हे प्रेग्नंसी फोटोशूटच वाटत आहे. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत देवोलिना पुन्हा प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न विचारला आहे.
View this post on Instagram
तर काही चाहत्यांनी देवोलिनाला ट्रोलही केलं आहे. आसामी गायक जुबीन गर्गचं निधन झालं असताना देवोलिना फोटोशूट करत असल्याची टीका केली आहेत. एकाने लिहिले, “आसामचे लोक आज रडत आहेत आणि तू फोटो शेअर करण्यात व्यस्त आहेस.” दुसऱ्याने लिहिले, “आसामी असूनही, आजच्या दिवशी असे करायला नको होते. आसाममध्ये काय चालले आहे, तुला नक्कीच माहिती असेल.”
देवोलीना भट्टाचार्जीचे आसामशी नाते
देवोलीनाचा जन्म २२ ऑगस्ट १९८५ रोजी ऊपरी आसामच्या शिवसागर येथे एका आसामी-बंगाली कुटुंबात झाला. तिने आसाममधूनच शिक्षण पूर्ण केले आणि दिल्लीतून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. त्यानंतर १४ डिसेंबर २०२२ रोजी तिने जिम ट्रेनर शहनवाज शेख यांच्याशी कोर्ट मॅरेज केले आणि दोन वर्षांनंतर १८ डिसेंबर २०२४ रोजी ती पहिल्या मुलाची आई झाली. ९ महिन्यांपूर्वी तिने मुलाला जन्म दिल्यानंतर आता ती पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा:
‘…तर परिणामांसाठी तयार राहा’ ; या मुस्लिम देशाने पाकिस्तानला दिला इशारा





