देवदासी आणि देहविक्री करणा-या महिलांचे अखेर कोविड लसीकरण सुरु !

Updated On:

पुणे : ‘कोरोना’ चा सर्वाधिक फटका बसलेल्या व समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या देवदासी आणि देहविक्री करणा-या महिलांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. बुधवार पेठ भागातील ‘हकमचंद नथुभाई गुजराथी’ या महापालिकेच्या शाळेमध्ये सिंहगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने लसीकरण करण्यात आले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे व पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांच्या सहकार्याने हे कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले.

बुधवार पेठेतील या वस्तीत पाहिल्यांदाच लसीकरण होत आहे. गेल्या 6 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या या महिलांना लस देण्यात आली. डॉ. नीलमताई गो-हे यांनी देहविक्रय करणा-या महिलांची कैफियत ऐकून घेऊन महानगरपालिका प्रशासनास सूचना केल्यानंतर प्रशासनामार्फत तात्काळ 250 लस उपलब्ध करुन देण्यात आल्या. या लसीकरणासाठी सिंहगर्जना प्रतिष्ठानतर्फे राजेंद्र शिंदे आणि आश्विनी शिंदे यांनी अथक प्रयत्न केले.

लसीकरणावेळी डॉ. गो-हे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे देवदासींशी साधला संवाद 

बुधवार पेठेत राहणाऱ्या या महिलांची संख्या जवळपास 3500 हजार हून जास्त आहे. काही महिला कामानिमित्ताने येथे येतात तर काही जण इथेच राहतात. पण धक्कादायक बाब म्हणजे या महिलांमध्ये जवळपास 50 टक्के महिलांकडे आधारकार्ड, पॅनकार्डच नाही. लसीकरणासाठी याबाबी आवश्यक असल्याने यांचे लसीकरण करायचे कसे असा प्रश्न आमच्या समोर आहे.

प्रशासनाने काहीतरी मार्ग काढावा आणि या महिलांचे लसीकरण करावे. कारण दिवसभरात वेगवेगळ्या लोकांना या महिला भेटत असतात आणि त्यामुळे कोरोना वाढू नये म्हणून या महिलांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. असे मत यावेळी शिवसेनेचे शहर संघटक व सिंहगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केले.

आणखी संबंधित बातम्या

Extortion Case On Police: खाकी डागाळली! पुण्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांचीच गुंडगिरी; थेट खंडणीचा गुन्हा दाखल

2026-07-06 06:30:36

Extortion Case On Police: खाकी डागाळली! पुण्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांचीच गुंडगिरी; थेट खंडणीचा गुन्हा दाखल

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

2026-05-17 19:03:58

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला; संजय राऊतांनी लगावला टोला

2026-05-02 18:27:43

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला; संजय राऊतांनी लगावला टोला

Bangladesh : बांगलादेशात गोवरमुळे १०० बालकांचा मृत्यू; देशभरात लसीकरणाची धडक मोहिम सुरू

2026-04-07 19:59:26

Bangladesh : बांगलादेशात गोवरमुळे १०० बालकांचा मृत्यू; देशभरात लसीकरणाची धडक मोहिम सुरू

Covid 19: कोरोनाचा नवा व्हेरियंट 23 देशांत पसरला; जगभरात आरोग्याबाबत चिंता वाढली

2026-03-26 18:53:45

Covid 19: कोरोनाचा नवा व्हेरियंट 23 देशांत पसरला; जगभरात आरोग्याबाबत चिंता वाढली