Devendra Fadnavis : राज्यात कुठेही गॅसची टंचाई नाही. काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती निर्माण करुन त्यांनी रांगा लावाव्या यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, केंद्र सरकार आणि गॅस कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की, घरगुती गॅस पुरवठ्याचे कोणतेही संकट नाही. महिन्याला जितका गॅस लागतो, तितका गॅस पुरवला जात आहे. त्यामुळे कोणीही चिंता करु नये. लोकांनी विनाकारण रांगा लावू नये. ऑनलाईन गॅस बुकिंग सुरु आहे. नागरीकांना वेळेत गॅस देण्यासाठी सिलिंडर उपलब्ध आहेत पण, देशात पॅनिक निर्माण करण्याची काँग्रेसची बुद्धी देशासाठी विघातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, यावरती तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. रुग्णालये, शासकीय आश्रम शाळा, अनुदानित आश्रम, वसतिगृहे, शासकीय खानावळी, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी अशा सर्व संस्थांना शंभर टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच, सर्व गॅस एजन्सींना दैनंदिन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सार्वजनिक सेवेतील संस्थांना 100 टक्के गॅस पुरवठा केला जाणार आहे. Devendra Fadnavis Gas Price Hike राज्यातील उपाहारगृहांना 70 टक्के, औषध उद्योगांना 50 टक्के, बीज प्रक्रियेसाठी 50 टक्के, मत्स्य पालन व्यवसायांना 50 टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे, संरक्षण क्षेत्र, पोलीस दल, हवाई वाहतुकीला 70 टक्के गॅस पुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, मध्य-पूर्वेतील परिस्थितीमुळे देशभरातील गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याची झळ महाराष्ट्रालाही पोहोचली आहे. सरकारकडून गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात अनेक भागांत ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. गॅस उपलब्ध नसल्याने नागरिकांना गॅस एजन्सीसमोर रांगेत उभे राहावे लागत आहे. सर्वाधिक सिलिंडर मार्चमध्ये उपलब्ध – भुजबळ Devendra Fadnavis राज्यात गॅस पुरवठ्याबाबत अफवा पसरल्या आहेत. राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नसून, नागरिकांनी इंधन किंवा गॅस तुटवड्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. राज्यात घरगुती गॅसची दैनंदिन मागणी 9,000 मेट्रिक टन असताना, त्याचे उत्पादन 11,000 मेट्रिक टनांपर्यंत नेले आहे. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत. तसेच, पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत होत राहणार आहे, नागरिकांनी निश्चिंत राहावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मिडीया पोस्टद्वारे म्हटले आहे.