Devendra Fadnavis | Dr. Babasaheb Ambedkar : देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर एका शानदार सोहळ्यात तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजप नेत्यासोबतच शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्यानंतर आता इतर मंत्र्यांच्या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिवेशनापूर्वी मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
🕗 स. ८.१२ वा. | ६-१२-२०२४📍मुंबई.
LIVE | भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन#Maharashtra #DrBabasahebAmbedkar #MahaparinirvanDin https://t.co/bEDIPUA4En
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 6, 2024
आज नव्या सरकारच पहिला दिवस आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दादरच्या चैत्यभूमीवर येऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे.
#Live l 06-12-2024 📍दादर, मुंबई महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने चैत्यभूमी येथे अभिवादन प्रसंगी – लाईव्ह https://t.co/rYkwhcUnbP
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 6, 2024
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारताचं संविधान जगातील सर्वात चांगलं संविधान असून, जगातील सर्व समस्यांचं समाधान आपल्या संविधानात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते, त्यांना सर्व विषयांचं ज्ञान होतं. ते आपल्याला भारतीय संविधानात पाहायलं मिळतं”. असं ते यावेळी म्हणाले.