Devendra Fadnavis : लाजीरवाणी घटना! अजितदादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; धक्कादायक प्रकार समोर येताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
Devendra Fadnavis : प्रकरण समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत संबंधित प्रमाणपत्रास स्थगिती देण्यात आली.

Devendra Fadnavis : अजित पवारांच्या अपघाती निधनादिवशीच मंत्रालयात अत्यंत लाजीरवाणी घटना घडल्याचं समोर आलं आहे. अल्पसंख्याक विकास विभागाने 75 शाळांना परस्परपणे अल्पसंख्यांक दर्जाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. हे प्रकरण समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत संबंधित प्रमाणपत्रास स्थगिती देण्यात आली.
तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय अधिकार्याकडून करुन दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. Devendra Fadnavis :
दरम्यान, मागील वर्षी ऑगस्टपासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांतच मंत्रालयातून प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे, 28 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशीच पहिले प्रमाणपत्र देण्यात आले.
75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे
राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असतानाच अल्पसंख्याक विभागाकडून अवघ्या चार दिवसांत तब्बल 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा समोर आल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Menopause Health: मेनोपॉजच्या काळात घ्या स्वतःची काळजी; योग्य आहार आणि जीवनशैलीने राहा निरोगी
दरम्यान, मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर ही स्थगिती डावलून मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
एखाद्या शाळेला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यानंतर त्यांना शिक्षक भरतीत TET लागू होत नाही. या शाळांवर RTE कायदा लागू होत नाही. याशिवाय कोट्यवधी रुपयांच्या देणग्या व अनुदान घेण्याची मुभा मिळते. माणिकराव कोकाटे यांनी १२ ऑक्टोबरला आदेश देत या प्रमाणपत्रांना स्थगिती दिली होती. मात्र कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर हा विभाग अजितदादांकडे होता. Devendra Fadnavis :
हेही वाचा:
Menopause Health: मेनोपॉजच्या काळात घ्या स्वतःची काळजी; योग्य आहार आणि जीवनशैलीने राहा निरोगी






