Devendra Fadnavis : विधानपरिषदेत मुदत संपणाऱ्या सदस्यांना निरोप देताना आज भावनिक वातावरण पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भरभरून कौतुक केले. फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सहा वर्षे विधानपरिषदेत काम करताना महत्त्वपूर्ण योगदान दिले. “ते पुन्हा सभागृहात आले तर त्यांच्या कोट्या ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. त्यांनी ठरवलं तर ते पुन्हा विधान परिषदेत येऊ शकतात,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Devendra Fadnavis तसेच त्यांनी ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वावर भाष्य करताना सांगितले की, “उद्धव ठाकरेंचा स्वभाव पारंपरिक राजकारण्यांसारखा नाही. त्यांच्या स्वभावात स्पष्टवक्तेपणा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच त्यांची रोखठोक भूमिका राहिली आहे.” पुढे त्यांनी पु. ल. देशपांडे यांचा उल्लेख करत, “शब्दांच्या कोट्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा क्रमांक वरचा आहे,” असेही म्हटले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. “राजकारणात पूर्णविराम नसतो, काम सुरूच राहते. आज निवृत्त होणारे सदस्य पुन्हा सभागृहात येतील, याची खात्री आहे,” असे ते म्हणाले. शिंदे यांनी पुढे म्हटले की, “उद्धव ठाकरे साहेबांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो, तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.” विधानपरिषदेत आज निवृत्त होत असलेल्या सदस्यांना निरोप देताना सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांविषयी आदर आणि सद्भावना व्यक्त केल्याचे चित्र पाहायला मिळाले. Devendra Fadnavis