“…तर म्हणतील ताजमहल मीच बांधला” ; देवेंद्र फडणवीसांचा नितीन राऊतांना टोला

Devendra Fadnavis on Nitin Raut। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. नितीन राऊत हे ताजमहल मीच बांधला आहे, असं सांगतील, अशी खोचक टीका फडणवीसांनीच केली.
काम काहीच करत नाहीत, पण एक पत्र देतात आणि… Devendra Fadnavis on Nitin Raut।
देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर नागपूर मतदारसंघात आयोजित केलेल्या भाजपचे उमेदवार डॅा. मिलिंद माने यांच्या प्रचारसभेत ही टीका केली. त्यांनी यावेळी बोलताना “काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांची एक विशेषता आहे. काम काहीच करत नाहीत. पण एक पत्र देतात आणि म्हणतात हे काम मीच केलं आहे. ते तर बॅकडेटेडमध्ये पत्र देऊन ताजमहाल मीच बांधला असं सांगतील. ताजमहल बांधण्याची माझीच मागणी होती असं म्हणतील,” अशा शब्दात फडणवीस यांनी नितीन राऊत यांचा समाचार घेतला.
नितीन राऊत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करतात Devendra Fadnavis on Nitin Raut।
उत्तर नागपुरात बांधले जाणारे रुग्णालय मध्य नागपुरात सुरू केले, अशा पद्धतीची खोटी माहिती देत नितीन राऊत मतदारांना भ्रमित करत आहेत. उत्तर नागपुरात लवकरच सर्वात मोठे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा
माजी खासदाराची ठाकरे गटातून हकालपट्टी; ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंची कारवाई





