Devendra Fadnavis : राज्यात एकही पाकिस्तानी राहणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट

मुंबई : राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत. या सर्व नागरिकांना देशाबाहेर घालवायची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृहमंत्री म्हणून सांगतो, राज्यात आलेला एकही पाकिस्तानी हरवलेला नाही.
जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत, ते सगळे सापडलेले आहेत. या सर्वांना राज्यातून घालवायची व्यवस्था केलेली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक आज संध्याकाळपर्यंत याठिकाणी राहणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, राज्यातल्या 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. यात नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. तर मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे.





