सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीमुळं देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले…

Updated On:

पुणे – भाजपनेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्यात आघाडीवर आहेत. मात्र त्यांच्यावर अनेकदा स्वपक्षातील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यातच आज सोमय्या यांना पुण्यात शिवसेनेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या घटनेवरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी आपला संताप ट्विटरवरून व्यक्त केला. ते म्हणाले की, राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही ! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका, अस आवाहन फडणवीस यांनी केलं. तसेच किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील, पायाखालची वाळू घसरली की माणूस बेफाम होतो. मुद्दे संपले की, गुद्द्यावर येतात. सभ्यतेचा बुरखा फाटला आहे. भावना गवळी यांच्यावेळी देखील तेच केलं. हसन मुश्रीफांच्या वेळी तेच झालं. पण सोमय्या घरी बसले नाही. ते घोटाळे बाहेर काढतीलच, असंही पाटील यांनी म्हटलं होतं.

तत्पूर्वी महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी सोमय्या महापालिकेत येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शिवसैनिक महापालिकेत जमले होते. मात्र सोमय्या नवीन इमारतीच्या प्रवेशदवरात येणार असल्याची माहिती मिळताच सर्व शिवसैनिक नव्या इमारती समोर गेले.

सोमय्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराने आले. त्यानंतर जुन्या प्रवेशद्वारात असलेल्या शिवसैनिकांनी त्यांना पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढा अशी मागणी करत त्यांना अडविले. त्यानंतर सोमय्या त्यांना भेटले. मात्र सोमय्या नवीन इमारतीत आल्याचे कळताच सर्व शिवसैनिक प्रवेशद्वारात आले आणि त्यांनी त्याची वाट अडविली.

त्यानंतर काही समजण्याच्या आताच धक्काबुक्की सुरू झाली. त्यानंतर एवढा गोंधळ झाली की सोमय्या यांचे सुरक्षा रक्षक बाजूला फेकले गेले. त्यानंतर सोमय्या यांना धक्काबुक्की करुन खाली पाडले  आणि मारहाण करण्यात आली. तसेच गाडीवर लाथा बुक्क्या मारण्यात आल्या.

आणखी संबंधित बातम्या

Ashwini Vaishnaw : मुंबईच्या विकासाला मिळणार बुस्टर! केंद्रीय मंत्रिमंडळाकडून रेल्वेच्‍या 7 प्रकल्‍पांना हिरवा कंदील

2026-09-09 20:09:52

Ashwini Vaishnaw : मुंबईच्या विकासाला मिळणार बुस्टर! केंद्रीय मंत्रिमंडळाकडून रेल्वेच्‍या 7 प्रकल्‍पांना हिरवा कंदील

Sugar Industry : सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू; साखरेचे दर कमी होणार?

2026-09-09 19:50:31

Sugar Industry : सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू; साखरेचे दर कमी होणार?

Jairam Ramesh : राजकीय पक्षांच्या माध्यमातून 10 हजार कोटींची करचोरी; जयराम रमेश यांचा आरोप

2026-09-09 19:39:06

Jairam Ramesh : राजकीय पक्षांच्या माध्यमातून 10 हजार कोटींची करचोरी; जयराम रमेश यांचा आरोप

Amruta Fadnavis: गरबामध्ये मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर अमृता फडणविसांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाल्या "सर्वसमावेशक उत्सव..."

2026-09-09 11:07:44

Amruta Fadnavis: गरबामध्ये मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर अमृता फडणविसांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाल्या "सर्वसमावेशक उत्सव..."

State Public Service Commission : राज्य लोकसेवा आयोगांची पुनर्रचना करा; 'या' भाजप खासदाराची मागणी

2026-09-08 15:12:23

State Public Service Commission : राज्य लोकसेवा आयोगांची पुनर्रचना करा; 'या' भाजप खासदाराची मागणी