मनसे आता ‘उनसे’झाली ; मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली
Updated On:

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यात जातीभेदाचे विष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष शरद पवार चालवत आहेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कशी वागणूक दिली हे धनगर समाजानेही पाहिले याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. राज ठाकरे हे वाट चुकलेले नेते असून ते आता पूर्णपणे वैफल्यग्रस्त झाले आहे. मनसे आता ‘उनसे’झाली आहे. उनसे म्हणजे ‘ उमेदवार नसलेली सेना’अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवली.





