Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा नागपूर दौरा; शेतकऱ्यांसोबत साजरी करणार दिवाळी
Devendra Fadnavis : फडणवीसांनी शेतकरी कुटुंबाच्या घरी केला मुक्काम

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरा करणार असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्री नागपुरातील लोहारी सावंगा गावातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. आज दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधत, त्यांच्या अडचणीही जाणून घेणार आहेत.
नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात, नरखेड तालुक्यात सरपंच आणि इतर लोकप्रतिनिधींशी साडे नऊ वाजता चर्चा करणार आहे. त्यानंतर अकरा वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री लोहारी सावंगा गावाच्या जवळील अनेक दशक रखडलेल्या खोरी जलसिंचन प्रकल्पाच्या कामाची पाहणी ही करणार आहे.
त्यामुळे अनेक वर्ष रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री थेट गावात येऊन शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना आहे.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्र्याने शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करत तिथेच जेवण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या. मुख्यमंत्री स्वतः नागपूर जिल्ह्यातील ‘लोहारी सावंगा’ गावात ‘रामभाऊ बालपांडे’ यांच्या घरी जेवण केले आणि मुक्काम केला.
तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे लोहारी सावंगा गावात ‘नंदुजी लोहे’ या शेतकऱ्याच्या घरी मुक्कामी राहिले. त्यानंतर आज (8 नोव्हेंबर) पुन्हा दुपारी 12 च्या सुमारास ते नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील कोहळी गावात काही शेतांची पाहणी करणार आहेत.
यंदाच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ प्रशासकीय यंत्रणेकडून मिळणाऱ्या अहवालातून न समजून घेता प्रत्यक्ष गावात जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा लोहारी सावंगा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे शेतकऱ्यांना आपल्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळणार आहे. पीकनुकसान, पीकविमा, नुकसानभरपाई, कृषी निविष्ठांचे दर, सिंचन, संत्रा उत्पादकांच्या समस्या आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांबाबत शेतकरी आपली भूमिका मांडू शकतात.
मुख्यमंत्र्याचा आजचा दौरा –
- सकाळी ०९:३० ते १०:३०: नरखेड तालुक्यातील लोकप्रतिनिधींसोबत चर्चा
- १०:३० ते ११:३०: क्षेत्रीय पाहणी दौरा
- ११:३० वाजताः लोहारी सावंगा येथून परतीचा प्रवास सुरू
- ११:३० ते दुपारी १२:१५ः लोहारी सावंगा ते कळमेश्वर तालुका – कोहळी येथील शेतीची पाहणी
- १२:१५ ते १२:३०: कोहळी ता. कळमेश्वर येथे दुष्काळग्रस्त शेती व जलसंधारण कामाची पाहणी१२:३० वाजताः
- कोहळी ता. कळमेश्वर येथून नागपूरसाठी प्रस्थान
- ०१:०० वाजताः नागपूर येथे आगमन
हेही वाचा:
Fuel during Diwali: दिवाळीत इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता





