Lok Sabha Election 2024 : मुंबईतील मतदानाबद्दल देवेंद्र फडणवीसांची आयोगाकडे तक्रार; नेमकं काय घडलं, पाहा….

Devendra Fadnavis | मुंबईत मतदानाचा वेग कमी झाला असल्याने त्या संबंधात आपण या तक्रारीची दखल घेण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आज मुंबईत दुपारी १ वाजेपर्यंत मुंबई उत्तर मतदारसंघात २६.७८ टक्के, मुंबई उत्तर मध्य २८.०५ टक्के, मुंबई उत्तर पूर्व २८.८२ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम २८.८१ टक्के, मुंबई दक्षिण २४.४६ टक्के आणि मुंबई दक्षिण मध्य २७.२१ टक्के मतदान झाले आहे.
फडणवीस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मुंबईतील मतदानाचा वेग कमी असल्याच्या तक्रारींची दखल घेण्याची मी निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. एकूणच मतदानाचा वेग अतिशय संथ असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत.
त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिका-यांना मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास सांगितले आणि बूथवर मतदानाच्या संथ गतीमुळे मतदारांना कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करण्याची सुचना केली.





