‘जय मल्हार’ फेम देवदत्त नागेने सहकलाकाराच्या आठवणीत शेअर केली भावूक पोस्ट

Devdatta Nage Post | छोट्या पडद्यावरील “जय मल्हार” या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या मालिकेत अभिनेता देवदत्त नागेने खंडोबाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला होता.
देवदत्तसह सुरभी हांडे, ईशा केसकर यांनी देखील यात प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त देवदत्त नागेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच त्याने मालिकेतील एका कलाकाराच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
देवदत्त नागे पोस्ट Devdatta Nage Post |
देवदत्त नागे अभिनेते अतुल अभ्यंकरच्या आठवणीत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. देवदत्तने पोस्टमध्ये लिहिले की, “प्रति… अतुल अभ्यंकर, अतुल… आज 18 मे 2024! 18 मे 2014, 7 वाजता Zee मराठी वर आपल्या “जय मल्हार” चा पहिला Episode प्रक्षेपित झाला आणि श्री खंडेराया चरणी आपली सेवा रुजू झाली! ”
“आज तुझी प्रकर्षाने आठवण येत आहे रे…देवयानी मालिकेमध्ये आपली ओळख आणि लगेच ऋणानुबंध’ तुझी अचानक एग्झीट अतिशय दुःखदायी होती! पण तरीही आपल्या सेट वर, आपल्या Make Up Room मध्ये तुझं अस्तित्व सतत जाणवत होतं ! अजूनही श्री क्षेत्र जेजुरीला, जेव्हा श्री हेगडी प्रधान ह्यांचे दर्शन घेतो तेव्हा…. तुझाच चेहरा समोर असतो रे…”
“अरे आज तू असतास तर आपल्या “जय मल्हार” मालिकेच्या दशक पूर्तीला सोन्याची झालर असती! अतुल… जय मल्हारची ही दशकपुर्ती तुला समर्पित आहे, जय मल्हार!”, असंही देवदत्तने पोस्टमध्ये लिहिले आहे. सोबत त्याने ‘जय मल्हार’ या मालिकेतील एका सीनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दरम्यान, अतुल अभ्यंकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ‘जय मल्हार’ मालिकेत त्यांनी साकारलेली प्रधानाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली. Devdatta Nage Post |
हेही वाचा:





