Devdatta Nage : “येळकोट जय मल्हार ! देवदत्त नागेंचं स्वप्न साकार, जेजुरीत उभं राहणार हक्काचं घर”

Devdatta Nage: मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकांमधून लोकप्रिय झालेले अभिनेते देवदत्त नागे यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. जेजुरी येथे ते स्वतःचं घर बांधणार असून नुकतंच भूमिपूजन पार पडलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या या स्वप्नपूर्तीची माहिती चाहत्यांना दिली.
श्री खंडेरायांच्या कृपेनं घराचं स्वप्न पूर्ण
‘जय मल्हार’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले आणि श्री खंडोबाचा भक्त म्हणून सर्वश्रुत असलेले देवदत्त नागे यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं ,
“येळकोट येळकोट… जय मल्हार! श्री खंडेरायांच्या कृपेनं साक्षात त्यांच्या सान्निध्यात माझं स्वतःचं घर जेजुरीमध्ये होत आहे. श्री खंडेरायांच्या चरणी माझी सेवा रुजू झाली, हेच माझं परम भाग्य.”
बहिणी-भाऊजींच्या हस्ते भूमिपूजन
अभिनेत्याने पुढे सांगितलं की, त्यांच्या बहिणी अमृताताई आणि भाऊजी संदीपजी घोणे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन पार पडलं. या वेळी गोंधळ, जागरण आणि भक्तिभावाने वातावरण भारून गेलं. देवदत्त नागे यांनी पुढे लिहिलं,
“श्री खंडोबा, आता मनामध्ये येईल तेव्हा तुझ्या सान्निध्यात राहायला मिळणार आहे. माझ्याकडून तुझी सेवा निरंतर घडत राहो हीच प्रार्थना. सदानंदाचा येळकोट जय मल्हार!”
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
देवदत्त नागे यांनी ही आनंदवार्ता सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जेजुरीमध्ये घर बांधण्याचं स्वप्न साकार झाल्यामुळे अभिनेत्याच्या पोस्टवर भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.
देवदत्त नागेची कारकीर्द
देवदत्त नागे यांनी ‘जय मल्हार’ मालिकेतून लोकप्रियता मिळवली. नुकतेच ते ‘उदे गं अंबे’ या मालिकेत झळकले. मराठी मालिकांसोबत त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपटांतूनही ते प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले आहेत.
मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकांमधून लोकप्रिय झालेले अभिनेते देवदत्त नागे यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. जेजुरी येथे ते स्वतःचं घर बांधणार असून नुकतंच भूमिपूजन पार पडलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या या स्वप्नपूर्तीची माहिती चाहत्यांना दिली.