Venezuela Earthquake : व्हेनेझुएलात विनाशकारी भूकंप.! १६४ जणांचा मृत्यू; एक हजाराहून अधिक जखमी
दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशाला विनाशकारी भूकंपाचा धक्का बसला आहे. एका मिनिटाच्या अंतराने झालेल्या 7.२ आणि 7.5 तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे प्रचंड विध्वंस झाला आहे.

Venezuela Earthquake – दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशाला विनाशकारी भूकंपाचा धक्का बसला आहे. एका मिनिटाच्या अंतराने झालेल्या 7.२ आणि 7.5 तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे प्रचंड विध्वंस झाला आहे.
यात अनेक इमारती आणि घरे कोसळल्याचे वृत्त असून १६४ नागरिकांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे तर एक हजाराहून अधिक लोक जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
व्हेनेझुएलाची राजधानी काराकासच्या पश्चिमेला बुधवारी एक शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामुळे इमारती कोसळल्या आणि लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
यू.एस. जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, काराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर (100 मैल) अंतरावर 7.2 तीव्रतेचा पहिला भूकंप झाला आणि त्यानंतर एका मिनिटापेक्षा कमी वेळात 7.5 तीव्रतेचा दुसरा धक्का बसला. प्राथमिक अंदाजानुसार मृतांचा आकडा 10,000 ते 1,00,000 च्या दरम्यान असू शकतो.
देशातील मुख्य विमानतळाचे नुकसान झाल्याने ते बंद करण्यात आले. तसेच काराकसपासून सुमारे १,७०० किलोमीटर दूर असलेल्या ब्राझीलमधील ॲमेझॉन भागापर्यंतच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.





